Categories: करमाळा

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने अभिवादन

करमाळा प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांनी सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण, सामाजिक उत्थान आणि जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या प्रभावाने अनेक क्षेत्रात केलेले योगदान आणि भारतीय समाजाला त्रस्त करणार्‍या घटकांशी लढवून समाज जागृतीचे केलेले कार्य आजमर आहे. हा वास्तवादाचा विचार सन १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, गुलामगिरीतुन समस्त वंचित समजाला बाहेर काढण्याचं काम करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले थोर महामानव पुन्हा होणे नाही.क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने महात्मा फुले याच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी स्वतः रक्तदान करून सहभाग घेतला. यावेळी मनसे चे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप, सुहास ओहोळ,भारिप नेते शहाजी ठोसर, कमलाईनगरी संपादक पत्रकार जयंत दळवी, भिमदल चे जिल्हा अध्यक्ष सुनील भोसले, भाजप तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिह ठाकुर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन होगले,तालुका उपाध्यक्ष राजू ठोंबरे, विकास मेरगळ, संजय घोरपडे, संतोष कांबळे, मनोज कुलकर्णी, रघूवीर खटके, अमोल नाळे, नवनाथ मोहोळकर सर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आण्णा सुपनवर, विक्रम राऊत, माजी सरपंच अंकुश जाधव, हनुमंत भोंग सर, मयूर यादव,राऊत सर, विशाल बनकर सह क्रांतीसुर्य प्रतिष्ठिन जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.*

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

3 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

24 hours ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago