पोथरे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात 150 जोड्यांचा भव्य सामूहिक मिरवणूक काढून पाद्यपूजनाचा कार्यक्रम राबवला आहे. यामध्ये 150 कुटुंबातील 300 आई-वडिलांची पारंपारिक वाद्याच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सात वाजता भैरवनाथ मंदिरापाशी आई-वडिलांना खुर्चीवर बसून त्यांच्या मुलांकडून त्यांची पाद्यपूजा करून त्यांना तीन प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी ऑड डॉ. बाबुराव महाराज हिरडे, प्रा. आजिनाथ झिंजाडे, पोलीस पाटील संदिप शिंदे, ऑड. नानासाहेब शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे, हरीश कडू, प्रशांत ढवळे, नाना पठाडे, यांनी आई-वडिलांच्या ऋणाविषयी विचार व्यक्त केले.
प्रतीक्रीया
(वेदामध्ये व संत वांग्मयामध्ये आई वडिलांचे स्थान अग्रगण्य आहे. अशा या आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांची गावातून मिरवणूक काढून पाद्यपूजा केली. आबासाहेब भांड पोथरे.)
(भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा केल्याने जगाचे दैवत पंढरीचा विठ्ठल स्वाता: पुंडलीकाला भेटण्यास येत असेल तर त्यांची सेवा किती श्रेष्ठ आहे . त्यामुळेच आम्ही आई-वडिलांविषयी कृतज्ञता सोहळा साजरा केला. गायनाचार्य गंगाधर शिंदे पोथरे)
आई-वडिलांच्या निधनानंतरचा विधी मोठ्या थाटात करण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना हा आनंद द्यायचा या हेतूने त्यांची मिरवणूक काढून पाद्य पूजा केली. दिवसभर आम्ही फक्त आई-वडिलांची सेवा केली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रेम हे शब्दात न सांगण्याजोगे होते. मृदंगाचार्य नाना पठाडे पोथरे.
.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…