करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील विद्यार्थी गेल्या काही वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये चमकत असून ते करमाळा तालुक्याची शान खऱ्या अर्थाने वाढवत आहेत. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी चिकाटीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जिल्हाधिकारी एसपी यासह मोठ्या पदांवरती काम करण्याची इच्छा बाळगून चिकाटीने अभ्यास करावा, व यश मिळवावे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी निश्चितपणे अडीअडचणीला उभे राहू, असे आवाहन मकाई कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजय बागल यांनी करमाळा येथे व्यक्त केलेे. बागल निवासस्थानी मांगी येथील प्रगती विद्यालयामध्ये शिकलेल्या प्रियांका अशोक ननवरे व हेमंत नितीन शिंदे यांची पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिये द्वारा निवड झाल्याबद्दल या दोघांचाही सत्कार करमाळा तालुक्याच्या माजी आमदार शामलताई बागल तथा मामी साहेब व मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी मांगी गावचे उपसरपंच नवनाथ बागल उपस्थित होते. बागल गटाच्या नेत्या व साखर संघाच्या संचालिका तसेच डीसीसी बँकेच्या संचालिका आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी मोबाईलवरून या दोन्हीही गुणी विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुपमा देवकर , पोलीस पाटील आकाश शिंदे, वांगी विकास सोसायटीचे चेअरमन डॉक्टर विजय रोकडे, युवराज रोकडे अशोक ननवरे, कृष्णा बागल, सचिन जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कार कार्यक्रमात प्रियांका ननवरे यांचे आई वडील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल करमाळा तालुक्याच्या माजी आमदार शामलताई बागल तथा मामी साहेब यांनी या दोन्ही गुणी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून भविष्यामध्ये यापेक्षाही अधिक सुयश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शेखर जोगळेकर यांनी केले.