Categories: करमाळा

करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, व्यापारी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करमाळा येथील ‘ हमाल भवन ‘ येथे सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी , नगरसेवक मनोज राखुंडे, दिपक सुपेकर, मा. संचालक मनोज गोडसे, मा. संचालक विठ्ठल रासकर, संचालक वालचंद रोडगे, नगरसेवक राजू आव्हाड, मयूर देवी, सरपंच भोजराज सुरवसे, बाबा घोडके, फारूक जमादार, खलील मुलाणी, सरपंच केशव शेळके, सरपंच देविदास वाघ, भागवत वाघमोडे, देवा लोंढे, सरपंच भाऊसाहेब काळे, ॲड. प्रशांत बागल, आदींच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर करमाळा शहरातून हलगी, सनई वाजंत्री द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप आदी महापुरुषांना अभिवादन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी लहान चिमुकली कु. जान्हवी राहुल सावंत हिने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोर कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन् व्यक्त केली. याप्रसंगी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी , राखणदार, व्यापारी वर्ग तसेच चेअरमन प्रभाकर शिंदे, पोथरे पोलीस पाटील शिंदे, बापू बेंद्रे, विठ्ठल इवरे , नाना पवार, वाजिद शेख, नवनाथ भांड, नागेश उबाळे, आबासाहेब वारे, हविन गायकवाड, जयद्रथ शिंदे, डॉ. सुभाष शेंद्रे आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हमाल भवन येथे अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, प्रमोद गायकवाड , दिलीप गायकवाड, महादेव कांबळे, राहुल कांबळे, सुधाकर कांबळे, राहुल ठोसर ,अशोक कांबळे ,अनिल रासकर ,किशोर ताकतोडे, विठ्ठल गायकवाड, शकील शेख ,सतीश खंडागळे, राजेंद्र कांबळे, मोहम्मद पठाण, संजय गायकवाड, सुभाष शेंडगे, हरिभाऊ मोहिते यांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

9 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

12 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago