करमाळा तालुक्यातील घारगाव येथील आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना ‘सहारा चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्यावतीने सन २०२३ चा “डॉक्टर बी आर आंबेडकर रत्न अवार्ड” जाहीर झाला आहे. सरवदे यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरवदे ह्या पती संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप, गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप, करुणा काळातील लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देणे, लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगणे, लस घेण्यास प्रवृत्त करणे,
शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण, शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देणे, लोकवर्गणीतून अनेक समाज उपयोगी कामे करणे, डोळे तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, मतिमंद अस्थिव्यंग विद्यालयात वह्या पुस्तके खाऊ वाटप, निराधार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप, सर्वसामान्य व गोरगरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊन त्यांनी अनेक विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे पती संजय सरवदे यांना देखील आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सहारा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अखलाक अहमद यांचे कडून कळविण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व करमाळा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाअध्यक्ष प्राध्यापक शशिकांत नरूटे व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो.त्यांच्या या सामाजिक कामात पती संजय सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…