जेऊर प्रतिनिधी- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२३-२८ च्या अनुषंगाने निवडणूक घेण्यासाठी लागणारी रक्कम पहिल्या टप्प्यात जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पैसे भरण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता, कारखान्याकडे रक्कम उपलब्ध झाल्याने सदरची रक्कम प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. यामुळे लवकरच निवडणूकीच्या दृष्टीने प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. सदरची निवडणूकीची सर्व तयारी कारखाना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वंच गटाने काळजी घ्यावी असेही चेअरमन डोंगरे म्हणाले.
चौकट
प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाचे निवडणूक निधी संदर्भातील पत्र आले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक निधीचा विषय ठेवून रक्कम भरण्यासाठीचा निर्णय एकमताने घेणे गरजेचे होते. तो निर्णय घेऊन आम्ही काल पहिल्या टप्प्यातील रक्कम सदर कार्यालयाकडे जमा केली आहे. यामुळे लवकरच प्रारुप मतदार यादी सादर होऊन हरकती घेण्याचा कालावधी दिला जाऊ शकतो. येणारी निवडणूक सर्वंच गटातील नेते मंडळी, कार्यकर्ते यांनी शांततेत पार पाडण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. धनंजय डोंगरे- चेअरमन, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…