करमाळा प्रतिनिधी करमाळातालुक्याच्या आजी – माजी लोकप्रतिनिधी बाबतीत…खरंतर तटस्थपणे, वस्तुनिष्ठ पद्धतीने काही गोष्टींचं विश्लेषण आणि निरीक्षण आपल्याला करता आले पाहिजे .परंतु दुर्दैवाने करमाळा तालुक्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण करण्याबरोबरच अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण करण्याची प्रवृत्ती नजीकच्या काळामध्ये वाढीस लागल्यामुळे एखाद्या नेत्याची दूरदृष्टी… त्याचे वेगळेपण …त्याचे वैशिष्ट्ये …काम करण्याची पद्धत या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा, दुर्लक्ष केले जाते. खरंतर या गोष्टी ठळकपणे पुढे यायलाच पाहिजेत. आ. संजयमामा शिंदे यांच्या बाबतीमध्ये आवर्जून उल्लेख करावा … वेगळेपण नोंदवावे अशा काही बाबी…
1.*अगदी गल्लीपासून, दिल्लीपर्यंत… सरपंचापासून ते मुख्यमंत्री पर्यंत टक्केवारीची पद्धत शासकीय कामकाजामध्ये रूढ आहे ,याला अपवाद असलेले नेतृत्व म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं*… *काम छोटे असो की मोठे असो .कोणत्याच कामाची टक्केवारी ते कधीच घेत नाही व इतरांनीही ती घ्यावी हे त्यांना पटत नाही*.
2. *वक्तशीरपणा हा आमदार संजयमामा शिंदे यांचा सगळ्यात महत्त्वाचा विशेष आहे .वेळेच्या बाबतीमध्ये ते खूप स्ट्रिक्ट असतात .कोणालाही एकदा वेळ दिली की ती त्यांनी पाळली असंच समजावे. गाव भेट दौऱ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता व्हायची, त्यावेळेस संयोजकच बऱ्याच वेळा त्या वेळेला हजर नसायचे परंतु आमदार संजय मामा मात्र 7 वाजून 55 मिनिटाला बरोबर त्या गावांमध्ये हजर असायचे .एवढेच नव्हे तर गाव भेट दौऱ्यामध्ये दिवसभरात कमीत कमी 10 जास्तीत जास्त 15 गावे घ्यावी लागायची .यामध्ये जर एखाद्या गावाला पोहोचायला वेळ लागला तर, जेवणासाठी जास्त वेळ जाऊ नये म्हणून स्वतःच्या गाडीमध्ये घरून बनवून आणलेला डबा ते ठेवायचे. प्रवासाच्या वेळेमध्ये 2 घास खाऊन पुढच्या गावाला वेळेवर पोहोचता यावं हे त्यांचे त्यां पाठीमागचे नियोजन असायचं*…
3. *आपल्याला मिळालेले राजकीय पद हे लोकांची कामे करण्यासाठीच आहे ही आ.शिंदे यांची भावना आहे. त्यामुळे काम घेऊन येणारा एखादा नागरिक कोणत्या गटाचा आहे हे पाहून त्याचं काम करायचं की नाही ही पद्धत आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे नाही .तसेच एखाद्या कार्यकर्त्याचे काम करायचे असेल तर तो मध्यस्थमार्फत आला पाहिजे… कोणीतरी ते काम सुचवलं पाहिजे*… *कोणीतरी फोन केला पाहिजे असं काही करायची गरज नाही. नागरिकांनी थेट त्यांना भेटून त्याची अडचण सांगावी प्रश्न सुटेल .तो कुठून आला ? कोणाचा आहे ? काय करतो ? कोणाचे काम करतो? याच्याशी आ.शिंदे यांना काहीही घेणे देणे नसते*.
4.*कमी बोलणं आणि अधिक काम करणं ही आमदार संजयमामा शिंदे यांची कार्यशैली आहे. ते विचार करून बोलतात .राजकीय सभांमध्ये ते कुणावर तरी टीकाटिप्पणी करण्यामध्ये वेळ खर्च करत नाही .आपण मतदारांसाठी काय केलं आणि भविष्यात काय करू शकतो याचीच मांडणी फक्त ते करत असतात*.
5.*तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न फक्त कार्यालयात बसून सुटत नसतात तर त्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत धडकावं लागतं*… *प्रश्नांची मांडणी करावी लागते ,पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी आमदार संजयमामांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. निमगाव ,करमाळा ,सोलापूर आणि मुंबई येथे स्वतंत्र स्वीय सहाय्यक आहेत.त्यांच्या मार्फत काम करतानाच आमदार संजयमामा सोलापूर आणि मुंबईसाठी आठवड्यातून 3 ते 4 दिवस वेळ आवर्जून देतातच*.
6.*वरवरचे*… *दिखाऊपणाचे काम आमदार संजयमामा शिंदे यांना पटत नाही. त्यामुळे आमदार झाल्यापासून संजयमामांनी कधीच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे कोणत्याही गावात जाऊन कधीच पूजन केले नाही की योजना सुरू व्हायची म्हणून पंपहाऊसवरती जाऊन बटन दाबून योजना सुरू केल्याचे अद्याप कोणीही पाहिलेले नाही. एवढेच नाही तर याला पाणी द्या*…*त्याचे बंद करा… कॅनॉल वर फिरा… फोटो काढा हे उद्योग ते कधीच करत नाही या पाठीमागे आमदार शिंदे यांची स्वतःची ठाम भूमिका आहे* …
7.*मी पाणी पुजनाचा नारळ फोडला म्हणून लोकांच्या जीवनामध्ये लगेच बदल दिसणार नाही*…*तर ही पाण्याची साखळी सातत्याने टिकवून ठेवावी लागेल*. …*भूगर्भातील पातळीमध्ये वाढ व्हावी लागेल*… *त्यासाठी तिन्ही हंगामामध्ये सातत्याने पाणी सोडावं लागेल तेव्हा त्याचे दृश्य स्वरूपात रिझल्ट दिसतील . फक्त पाणी आले ,लाईट आली म्हणजे समृद्धी आली असं नाही. तर वीज आणि पाण्याचा पुरवठा योग्य दाबाने आणि नियमित व्हायला पाहिजे*… *उत्पादन वाढ व्हायला पाहिजे त्यानंतरच समृद्धीची फळ सगळ्यांना चाखायला मिळतील*… *लोकांच्या राहणीमानामध्ये बदल घडेल. दुचाकीवाला चार चाकीतून आला*…*साधा घरावाला चांगलं स्लॅब चे घर बांधायला लागला तरच ती समृद्धीची लक्षणं ओळखावी. 36 गावांमध्ये माढा तालुक्यात असं घडलेलं आहे .आपल्याकडे असे व्हायलाच पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका आहे .फक्त नारळ फोडल्याने काहीच घडणार नाही*.
8.*लोकांना खुश करायचे म्हणून कोणालाही खोटे आश्वासन आमदार शिंदे कधीच देत नाहीत .दहिगाव योजनेच्या कार्यक्षेत्र बाहेरील एखाद्या गावाने पाणी मागणी केली तर ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगतात. जर एखादं गाव कार्यक्षेत्रामध्ये असेल परंतु त्या गावातील एखादी चारी अनधिकृत असेल तर तिला अधिकृत करायलाही ते कधीच परवानगी देत नाहीत. कार्यक्षेत्रातील एखाद्या गावाचा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या भागालाही पाणी देण्यासाठी आपण रीतसरपणे प्रस्ताव देऊ* …*जी गावे योजनेमध्ये समाविष्ट नाही त्यासाठीचा वाढीव प्रस्ताव देऊ …*योजनेसाठी पाणी वाढवून घेऊ आणि नंतर त्यांचा समावेश करू हे दीर्घकालीन उपाय ते सुचवतात. याचे बंद करा आणि त्याला सुरू करा या उद्योगामुळे काहीच नीट घडत नाही हे त्यांचे स्पष्ट मत आहे*.
9.*तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरांमध्ये राजकारण शिजत आहे. श्रेयवादाचे राजकारण रंगते आहे* …*आठ हात लाकूड त्याची नऊ हात धलपी निघते आहे .असे असतानाही आमदार शिंदे आपण केलेल्या विकास कामाबाबत खूप कमी बोलतात* …*कमी बोलणे आणि जास्त काम करणे हे त्यांचे सूत्र आहे . त्यामुळे मी हे केलं* …*मी ते केलं असा गवागवा ते करत नाही*.
10.*कोणी टीका केली तर लगेच त्याला उत्तर देणे हे त्यांच्या तत्त्वात बसत नाही , टिकेकडं ते दुर्लक्ष करतात. जर ती विधायक टीका असेल तर त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून पुढील वाटचालीसाठी ते पाऊल उचलतात*…
11. *कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा छोटा – मोठा कार्यकर्ता यांच्याशी बोलताना आमदार संजयमामा सर्व प्रोटोकॉल पाळतात. विनाकारण खूप सलगी आहे म्हणून बोलताना घसरत नाही किंवा छोटा, किरकोळ कर्मचारी आहेत म्हणून त्याच्यासाठी अर्वाच्च भाषा सुद्धा ते वापरत नाहीत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून ते अगदी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आमदार संजयमामा यांच्या बद्दल सर्वांच्याच मनामध्ये आदरयुक्त भीती आहे. प्रशासन त्यांच्या शब्दावरती हलते आणि कामही करते.कारण चुकीचं काम करावं यासाठी त्यांचा हट्ट नसतोच*…..
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…