करमाळा प्रतिनिधी-ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नरसिंहआप्पा मनोहरपंत चिवटे यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त मकाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजयजी बागल यांनी विशेष अभिष्टचिंतन करून त्यांचा सत्कार केला व आप्पांचे आशीर्वाद घेतले. आज श्री नरसिंहआप्पा यांनी आपल्या वयाला 83 वर्षे पूर्ण केली आहेत. आप्पांचा अनुभव आणि त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन ज्याप्रमाणे माझे वडील लोकनेते स्वर्गीय दिगंबर मामा बागल यांच्या पाठीशी होते. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत. आणि भविष्यामध्ये देखील आप्पांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद राहतील अशी अपेक्षा श्री दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या विद्यमान संचालिका व बागल गटाच्या नेत्या आदरणीय रश्मीदीदी बागल यांनी भ्रमणध्वनीवरून श्री नरसिंहआप्पा चिवटे यांना आपल्या शुभेच्छा देऊन आप्पांच मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी आहे. आणि ते भविष्यातही निश्चित राहील स्वर्गीय बागल मामांच्या काळापासून चिवटे परिवार व बागल परिवाराचे मैत्रीचे व स्नेहाचे नाते आहे.श्री. आप्पांचे सुपुत्र श्री मंगेश भाऊ चिवटे हे सध्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत याचा संपूर्ण करमाळा तालुक्याबरोबरच आम्हाला देखील अभिमान आहे. अशा भावना यावेळी रश्मीदीदी बागल यांनी व्यक्त केल्या. आणि कमलाभवानी देवीने आप्पांना उदंड आयुष्य द्यावे अशी प्रार्थना ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री मंगेश भाऊ चिवटे पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यासह आदिनाथ कारखान्याचे संचालक नामदेव भोगे, पत्रकार जयंत दळवी ,पत्रकार श्री राजेश गायकवाड,पत्रकार अविनाश जोशी, त्याचबरोबर पत्रकार प्रफुल्ल दामोदरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री दिग्विजय बागल यांनी श्री नरसिंह आप्पा यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ भगवी शाल देऊन विशेष सत्कार केला. यावेळी दिग्विजय बागल यांनी या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराची पाहणी केली, व करमाळा तालुक्यामध्ये गावोगावी अशी शिबीरे आयोजित केल्यास याचा रुग्णांना निश्चित लाभ होईल. त्यासाठी मी आणि रश्मीदीदी या आरोग्य शिबिरांना निश्चित सहकार्य करू व सर्व यंत्रणा या आरोग्य शिबिरासाठी देऊ असे अभिवचन यावेळी दिले. रुग्णांना वेळेवर औषध उपचार व तेही मोफत देण्याचं मोलाच काम माननीय मंगेश भाऊ आणि श्री महेश हे करत आहेत. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.