Categories: करमाळा

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम संस्थेचा अभिनव उपक्रम करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली, माळी गल्ली ,दगडी रोड ,किल्ला विभाग रोड कडे जाणारे रस्ते व भोवतालचा परिसर सी सी टीव्ही कॅमेराने सुसज्ज

.

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील
सामाजिक सेवेत अग्रेसर असणारी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांनी नागरिकांनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोहल्ला गल्ली, माळी गल्ली, दगडी रोड ,किल्ला विभाग रोड कडे जाणारे रस्ते व भोवतालचा परिसरात तसेच माॅं आयशा मस्जिद व दत्त मंदिर परिसर या धार्मिक स्थळाला सी सी टीव्ही कॅमेरे बसवून नागरिकांच्या होणारे चो-या पासुन व इतर अप्रिय घटनां घडण्यास रोखले जावे म्हणून हा संपूर्ण परिसर सी सी टीव्ही कॅमेरे ने सुसज्ज करण्यात आला आहे. या संपूर्ण परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व खास करून महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व त्यांच्या सर्व सहका-याच या कामाबद्दल कौतुक केले आहे. करमाळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चे लोक अर्पण कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहरातील एखाद्या परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा हा पहिलाच उपक्रम असून सीसीटीव्ही कॅमेरे हे आपल्या सभोवताली भागात बसविणे ही काळाची गरज आहे यामुळे अनेक धोके व अप्रिय घटना टाळण्यासाठी मदत होते, चोरी व दरोडेचे प्रमाणात वाढ झाली आहे त्याला सी टीव्ही कॅमेरे च्या माध्यमातून आळा घातला जावु शकतो . विधान परिषदेचे भाजपाचे कर्तव्यदक्ष आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी या परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे समाधान व्यक्त केले व संस्थेचे व सर्व सहका-यांचे या उपक्रमाबद्धल कौतुक केले. यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील , मुस्लीम समाजातील समाजसुधारक व विचारवंत मा. कलीम काझी सर, अशपाक भाई सय्यद पत्रकार, आलीम भाई शेख पत्रकार, युवक नेते आझाद शेख, यावेळी संस्थेचे चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, सचिव पिंटु शेठ बेग, जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष जमीर भाई सय्यद, उपाध्यक्ष जहाँगीर बेग,फिरोज बेग, इमत्याज पठाण, इंदाज वस्ताद,जिलाणी पठाण , दिशान कबीर, माजित शेख, अरबआज बेग, अकिल शेख, सलीम शेख,इस्त्रायल शेख उपस्थित होते कार्यक्रमच्या शेवटी संस्थेचे सचिव पिंटु शेठ बेग यांनी आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

5 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago