Categories: करमाळा

उमरड येथील पठाडे यांचा नऊ लाखाच्या ट्रॅक्टरची चोरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

करमाळा प्रतिनिधी उमरड येथील सौ. सूनिता संजय पठाडे यांच्या नावावर असलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 45 ए क्यू 2705 ट्रॅक्टर गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रानातून आज्ञा चोरट्याने चोरून नेला आहे. या ट्रॅक्टर चोरीने उमरट परिसरात शेतकरी वर्गामध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तात्काळ या चोराचा तपास लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पठाडे यांनी शेती कामासाठी काही महिन्यापूर्वी ट्रॅक्टर घेतला होता शेतात उसाची लागण करण्यासाठी लागणारे ऊस बेणे आणून ट्रॅक्टर ठेवला होता रानापासून वस्ती पाचशे फुटाच्या अंतरावर आहे आज्ञा चोरांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरला जोडलेली मोगऱ्याचे अवजार जागेवरच सोडून ट्रॅक्टर चोरून नेला आहे. वस्तीच्या रस्त्याने ट्रॅक्टरने आता चक्क उसाच्या पिकातून मांजरगाव रस्त्याने ट्रॅक्टर नेला आहे ट्रॅक्टर मालकाने परिसरात सर्वत्र शोध मोहीम राबवली परंतु ट्रॅक्टर मिळून आला नाही याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे सदर चोरीचा ट्रॅक्टर कोणाला आढळल्यास भ्रमणध्वनी 73 87 15 65 15,मो. 82 75 44 80 96 या संपर्क क्रमांक संपर्क साधण्याच्या आव्हान पठाडे परिवारातर्फे करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

11 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

16 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

18 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago