Categories: करमाळा

केकेआर फोटोग्राफर युनियन अध्यक्षपदी सागर डाळिंबे तर उपाध्यक्षपदी महिंद्र मांडगे यांची बिनविरोध निवड.

 

कर्जत प्रतिनिधी – कर्जत करमाळा रिव्होल्युशन फोटोग्राफर युनियनच्या अध्यक्षपदी आर्या फोटोग्राफीचे संचालक सागर डाळिंबे तर उपाध्यक्षपदी महिंद्र आर्ट चे संचालक महेंद्र मांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्जत येथील हॉटेल केशर व्हेज या ठिकाणी 21 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माऊली जाधव,राज झिंजाडे,सचिन पोटे,शहाजी गोरे, दत्तात्रय ससाणे, संपत नेवसे, सुमित भैलुमे, संदीप साळवे, दादा पवार यांची संचालक पदी निवड करण्यात आली.
यासारखे लॅब मुंबई व केकेआर फोटोग्राफर युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने छायाचित्रकारांसाठी अल्बम डेमो चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एस आर के लॅब ऑल इंडिया मार्केटिंग हेड प्रदीप शहा यांनी अल्बम व फोटोग्राफी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले तसेच नितीन कोल्हे, दत्ता ससाने, भाऊसाहेब गायकवाड,सचिन पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अण्णा बागल,भरत तुपे, राजेंद्र तोरडमल, महेंद्र पठाडे, अक्षय फरताडे, सागर पवार, कृष्णा जरांगे, तुकाराम सायकर,अशोक सुद्रिक आदी छायाचित्रकार उपस्थित होते. शिरीष यादव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

11 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

16 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

18 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago