करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गरीब मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त मोफत दूध वाटप करण्यात आले,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए.पी.आय जगदाळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जयंत दळवी, आश्पाक सय्यद, दिनेश मडके, विशाल परदेशी, सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते,
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ए.पी.आय जगदाळे म्हणाले की श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य हे हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून त्यांचे विद्यार्थ्यांना मोफत भात- भाजी वाटप व शहरातील निराधार वृद्ध नागरिकांना दोन वेळचे जेवण देणे हे कार्य खूप पुण्याचे व कौतुकाचे आहे,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरणजी बोकन यांनीही मनोगत व्यक्त केले,
या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास आबा जाधव, रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,चंद्रकांत कांबळे सर, समीर शेख ,सुरज शेख, मस्तान कुरेशी,ह भ प रघुनाथ काळे महाराज ,वंजारवाडीचे विद्यमान सरपंच प्रवीण बिनवडे, युवराज किरवे, गजराज चिवटे, दीपक सवालके, गणेश किरवे, जयंत काळे पाटील, शरद कोकीळ, संजय किरवे, गणेश गोसावी, भैय्या कुंभार, वसीम सय्यद, आकाश चिवटे आदी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते,
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…