देवळाली येथे ग्रामदेवत श्री नागनाथ महाराज यांची यात्रा उत्साहात संप्पन

*देवळाली  प्रतिनिधी अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर देवळाली येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा संपन्न झाली यात्रेचे मुख्य आकर्षण पहिला टप्पा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम साडेसहा वाजता संपन्न झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते तसेच गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानंतर भाविकांनी शेरनी वाटपाचा कार्यक्रम ढोल ताशा डीजे व हलग्याच्या गजरात संपन्न झाला तसेच श्री ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे हे देखील उपस्थित होते व त्यानंतर रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत छबिण्याचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला तसेच उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे लोकांची पाणीची गैरसोय होऊ नये म्हणून कै. कल्याण भाऊ गायकवाड यांच्या स्मरणार्थ पाणपोई उभारण्यात आली होती यावेळी कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यात्रा कमिटीचे वतीने तसेच करमाळा पोलीस स्टेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता या बंदोबस्तासाठी करमाळा पोलीस स्टेशनची पीएसआय माहुलकर साहेब, ढवळे साहेब व त्यांची टीम उपस्थित होतेे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

11 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

15 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

17 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago