Categories: करमाळा

देशात राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने कार्यकर्त्यानी‌ या संधीचा फायदा घेऊन‌ कामाला लागावे – आमदार रविंद्र धंगेकर

करमाळा प्रतिनिधी देशात राज्यात  सध्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने बदलाची सुरूवात कसब्यातुन सुरु झाली आहे कार्यकर्त्यानी‌ या संधीचा फायदा घेऊन‌ कामाला लागावे असे आवाहन कसबा पेठचे पुणेचे आमदार विकास धंगेकर यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते व्यासपिठावर काॅग्रैंसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ देशमुख, माजी नगरसेवक राहुल जगताप, अभिषेक आव्हाड जामखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे शहराध्यक्ष सुजय जगताप ओ बी सी तालुकाध्यक्ष गफुर शेख संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके आदी उपस्थित आहेत.या कार्यक्रम प्रसंगी उपसभापती चिंतामणी जगताप प्राध्यापक रामदास झोळ राजाभाऊ देशमुख शहाजी राजेभोसले प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रतापराव जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.  पुढे बोलताना ते म्हणाले की लोकनेता होण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आपले स्थान घट्ट करून लोकनेता होण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करा जनता तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदार केल्याशिवाय राहणार नाही असे मत कसबा पुणे चे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.करमाळा येथे काँग्रेस आय करमाळा तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घघाटन काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसाच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की मी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला असून जनतेचे काम करत लोकांच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण केले आहे.सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार यशस्वी प्रवास केला आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा पक्ष असुन देशाला स्वांतत्र करण्यासाठी त्याचे मोठे बलिदान आहे.देश उभा करण्यासाठी त्यागाची परंपरा असलेला पक्ष असून या पक्षाने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन राजकारण केलेले आहे. सर्वसामान्यांचे भले करण्याचे ताकद काँग्रेसमध्ये असून जनतेच्या मनामध्ये भाजप विषयी प्रचंड चीड आहे भाजप सरकारने हे घोषणांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लोटण्याचे काम या सरकारने केलेले आहे शेतकरी सर्वसामान्य जनता मराठा आरक्षणाचे प्रश्न ओबीसी वर्ग यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे या सरकारकडे नाहीत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला वाढता जनाधार मिळत असून बदलाची वारी संपूर्ण देशभर पाहणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून बदलाची सुरुवात कसबा पुणे येथून झाले असून याच्या 2024 आघाडीचे सरकार राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे या संधीचा आपण फायदा उठून सर्वसामान्य जनतेचे काम करा जनता तुमच्या कामाची पावती देईल माझे स्वतःचे उदाहरण आपणांसमोर आहे तरी येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक राहूूल जगताप यांनी मानलेे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

11 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

15 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

17 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago