Categories: करमाळा

सभासद शेतकऱ्याच्या मनात आले तर आदिनाथ मकाई साखर कारखान्याचा बचाव होईल फक्त बचाव आणि हटवा म्हणून चालणार नाही-ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील दोन सहकारी संस्था मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीचा धुराळा उडणार असुन, विद्यमान चेअरमन धनंजय डोंगरे यांनी लवकरच निवडणुक होणेबाबत संकेत दिले असुन, त्यासाठीची आवश्यक रककम भरणा केलेचे वक्तव्य केलेले आहे. तर एकीकडे दत्तकलेचे संस्थापक असणारे प्रा. रामदास झोळ यांनी बचाव चा नारा देऊन जागृती चालु केली आहे. त्यांचे समवेत बचावची काही नेतेमंडळीही नुकतीच एका बैठकीत दिसुन आलेले आसुन, आदिनाथ कारखान्याची निवडणुक बिनविरोध करावी म्हणुनही वल्गना होत आहेत.. याविषयी केत्तुरचे माजी सरपंच व पश्चिम भागातील जाणकार व अभ्यासु युवक नेते ॲॅड. अजित विघ्ने यांना या सर्व पार्श्वभुमी बाबत मत विचारले असता, त्यांनी सांगितले की, आदिनाथ व मकाई साखर कारखान्यांना वाचवायचे असेल तर त्यासाठी शेतकरी सभासदांनी एक होवुन सर्वसामान्य लोकांनी कारखान्याच्या निवडणुकीत उतरून बचावसाठी एकत्र यायला पाहीजे तरच शेतकरी सभासदांचे भले होईल.. फक्त बचाव आणि हटाव म्हणुन भागणार नाही तर आपले कारखाने वाचावेत ही प्रेरणा प्रत्येकाच्या मनात उत्पन्न झाली पाहीजे.. अन्यथा कारखान्यांचे आणि पर्यायाने शेतकरी, कामगार यांचे वाटोळे निश्चित आहे. तालुक्यात नवी जुनी अनेक मंडळी निवडणुकीसाठी नटलेली असुन, बचाव चे नाटक यापुर्वीही अनेक निवडणुकात झालेले आहे. ज्यांना कारखाने व्यवस्थित चालवायचे नाहीत त्यांनी निवडणुकीत उभा राहण्याचे पापही करू नये. तसेच निवडणुकीत अनेक गटातटाचे पॅनल होतील आणि मग नवे जुने पुढारी आपआपल्या पॅनलमधुन उमेदवारी घेतील.. बचाव बचाव म्हणुन पुळकाही आणतील परंतु अशा लबाड आणि ढोंगी पुढाऱ्यांना वेळीच दुर करावे.. तीच तीच माणसे आपले उदयोगधंदे सोडुन या निवडणुकांमधे येत आहेत त्या सर्वांना नाकारावे आणि नवीन दमाच्या आणि होतकरू अशा शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढे येऊन आदिनाथ आणि मकाई कारखान्याची निवडणुक लढवावी असे आपले स्पष्ट मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेजारीच असणारे खाजगी कारखाने बारामती अॅग्रो, अंबालिका, दौंड , नवीन हळगाव, विठ्ठल यांनी गाळप क्षमता वाढवली असुन भविष्यात ऊस दराची स्पर्धा होणार असुन, ऊस मिळविण्याची देखिल स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे व सक्षम संचालक मंडळाची गरज आहे. त्यासाठी आता सर्वसामान्य शेतकरी सभासंदानी स्वतःहुन पुढे आले पाहीजे. अन्यथा पहीले पाढे पंच्चावन झालेच म्हणुन समजा. बचाव हा प्रत्येकाच्या मनात असायला पाहीजे. काही लोकांनी बचावचे दिलेले नारे कितपत खरे आहेत ते आगामी काळात दिसणारच असुन, सर्वसामान्य शेतकरी सभासदांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी आपण आमदार. संजयमामा शिंदे व माजी आमदार. जयवंतराव जगताप साहेब यांना बोलणार असल्याचे देखिल या निमित्ताने त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

10 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

14 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

15 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago