करमाळा प्रतिनिधी अवकाळी पावसाचा तडाखा बसुन अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे देवळाली परिसरातील काही घरावरील पत्रे उडाले व शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये केळी,ऊस आंबा,लिंबू यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले त्याचबरोबर देवळाली गावातील श्री मारूती शंकर बिचितकर यांची झाड पडून गाई दगावली सदर नुकसानीची दखल मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी घेतली व लगेच प्रशासनाला फोन वरून संपर्क साधला व सदर नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असे सांगितले त्याचबरोबर मा.सरपंच यांनी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री संजयमामा शिंदे यांना संपर्क साधला त्यांनीही प्रशासनाला आदेशित केले त्यानंतर मा.तहसीलदार श्री विजयकुमार जाधव साहेब यांनी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेबव कृषी सहायक यांना सदर नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…