करमाळा प्रतिनिधी चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकांत काका सरडे यांचा सरपंच सेवा संघाच्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान करमाळा प्रतिनिधी चिखलठाण गावचे विकासरत्न सरपंच चंद्रकांत काका सरडे यांचा सरपंच सेवा संघाच्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान करण्यात आला.सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावशे पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या शुभहस्ते अहमदनगर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला चंद्रकांत सरडे यांनी चिखलठाण गावचे सरपंच झाल्यानंतर गावामध्ये दहा कोटीची विकास कामे केली आहे.यामध्ये रस्ते पाणी वीज कोटलिंग देवस्थान युवर ब्लॉक बसवणे दलित वस्ती सुधारणा घरकुलाचे कामे ,विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शाळा अंगणवाडीचे डिजिटल करणे गावामध्ये 2000 नारळ वृक्षाचे वृक्षारोपण याबरोबर विकासाचे प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावुन जनतेच्या विकासाची काम केले आहे.शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल शेतकऱ्यांना कृषी योजनेच्या लाभ मिळवून देऊन अनेकांचे जीवन समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तुत्वावर ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा परिषद सदस्य ते चिखलठाण गावचे सरपंच असा काकांनी यशस्वी राजकीय प्रवास केला आहे. 24 तास जनतेची सेवा करणारा सर्वसामान्य जनतेला जनतेच्या हाकेला धावणारा लोकनेता म्हणून काकाची एक वेगळी ओळख असून आपल्या कार्यातून त्यांनी जनतेमध्ये कौटुंबिक जिव्हाळयाचे नाते निर्माण केले आहे. विरोधकालाही आपलेसे वाटणारे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे चंदूकाका सरडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे . कोरोना काळातही चंदूकाका सरडे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती कोरोना लसीकरण कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून भव्य रक्तदान शिबिर तसेच नागरिकांना मोफत किराणाचे वाटप केले आहे. कोरोना महामारीतही स्वतःची जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनतेला जनतेचे प्राण वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चंद्रकांत सरडे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.