Categories: करमाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात शंभरावा कार्यक्रम करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी साजरा

करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी करमाळा तालुकाध्यक्ष मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमाचे करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते,
मन की बात हा कार्यक्रम करमाळा तालुक्यातील 21 गावांमधून 400 ते 500 नागरिकांनी ऐकला आहे, मन की बात कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान
मा.मोदीजी म्हणाले की, “मन की बात या कार्यक्रमाने मला अनेक आव्हानाचं उत्तर मिळवून दिलं आहे. त्यातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि जनभाव कोट्यावधी लोकांसह माझ्या भावविश्वाचा अतूट भाग बनला आहे.”
बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम, स्वच्छता आंदोलन, खादी प्रेम, निसर्गाची गोष्ट, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असे जे विषय ‘मन की बात’ कार्यक्रमात आले ते जन आंदोलन झाले..
या १०० व्या पर्वाबाबत हजारो पत्रे, संदेश मा.पंतप्रधानांना आले आहेत. यात अत्यंत भावुक, अंतर्मुख करणारी देखील पत्रे आहेत. मात्र या कार्यक्रमाचे श्रेय आणि अभिनंदनाचे मानकरी ‘मन की बात’चे श्रोते आहेत असे देखील त्यांनी विनम्रपणे नमूद केले.
३ ऑक्टोबर २०१४ हा विजयादशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून या दिवशी हा प्रवास सुरू केला. ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या सकारात्मकतेचा अनोखा सण झाला आहे..
देशाच्या विकासाला एका नव्या उंचीवर नेणारा हा कार्यक्रम भारतच नव्हे तर जगभरात मा.पंतप्रधानांची एक नवी ओळख बनला आहे.. असे म्हणले,या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गणेश चिवटे म्हणाले की आपल्या अत्यंत उद्बोधक शैलीत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेले मार्गदर्शन ऊर्जादायी, कार्याची नवी दिशा देणारे आणि प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करणारे ठरले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भगवानगिरी गोसावी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजपा व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया ,
पत्रकार जयंत दळवी ,मोहन शिंदे, डॉ. अभिजीत मुरूमकर,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, विजयकुमार नागवडे, नितीन झिंझाडे, प्रवीण बिनवडे, धर्मराज नाळे, सोमनाथ घाडगे , महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे,दादासाहेब गाडे, हर्षद गाडे, दत्तात्रय पोटे, सागर नागटिळक, गणेश तळेकर, किरण शिंदे, शरद कोकीळ, वसीम सय्यद, भैय्या कुंभार ,जयंत काळे पाटील ,मनोज मुसळे, शिवाजी कुंभार , विनोद इंदलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago