करमाळा प्रतिनिधी
विजयादशमीच्या दिवशी 3 ऑक्टोंबर 2014 रोजी मन की बात या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आज 30 एप्रिल 2023 रोजी शंभर वा भाग प्रसारण कार्यक्रम संपन्न झाला
करमाळा तालुक्यातील संगोबा येथे थेट प्रसरण कार्यक्रमावेळी माजी मंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे स्वीय सहाय्यक प्रतीक शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकारराजे निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, शेटफळ चे नानासाहेब मोरे, बाबुराव शिंदे, बाळासाहेब माळी आदि जण उपस्थित होते.. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे सर्वप्रथम आभार व्यक्त केले मन की बात या उपक्रम द्वारे वेगवेगळ्या समूहाशी मी संपर्क साधू शकलो तसेच मन की बात मुळे आंदोलन हे जन आंदोलन च्या रूपात परावर्तित झाले या गोष्टीचा मला आनंद वाटतो, मन की बात या कार्यक्रमाद्वारे बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, अमृत महोत्सव ,अमृत सरोवर या मोहिमेने जन आंदोलन चे रूप घेतले तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी साधलेला संवाद याची चर्चा संपूर्ण विश्वामध्ये झाली. मला आज आठवते ज्यावेळेस मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस कामाची मर्यादा व त्यानंतर दिल्लीत आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर वाढलेली जबाबदारी परंतु मन की बात दारे दर महिन्याला हजारो देशवासियांची पत्रे येतात यामुळे त्यांच्या भावना कळतात यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते यावेळी हरियाणाची सुनील जगरानी यांच्या सेल्फी विथ डॉटर या उपक्रमाचे कौतुक केले ,छतीसगढ येथील स्वयंसहायता समूह च्या वतीने स्वच्छता अभियान तसेच तामिळनाडू आदिवासी महिलांच्या वतीने हजारो इको फ्रेंडली टेराकोटा कप निर्यात तीच या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच तमिळनाडू येथीलच वीस हजार महिलांकडून बेल्लोर मध्ये नाग नदीला पुनर्जीवित करण्याचे काम नारी शक्तीने केले त्यांचेही कौतुक केले. तसेच जम्मू कश्मीर येथील मंजूर अहमद यांच्या पेन्सिल स्टेट्स या उपक्रमाचे कौतुक केले विशाखापट्टणमन येथील वेंकट मुर्ती प्रसाद यांच्या आत्मनिर्भर चार्ट याद्वारे भारतीय उत्पादनाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम तसेच मणिपूर येथील विजय शांती देवी यांच्या कमळाच्या सालीपासून इको फ्रेंडली कपड्याचे निर्मिती याचाही उल्लेख त्यांनी मन की बात मध्ये केला मुलांसाठी खेळणी उत्पादक तसेच छोटे व्यवसायिका द्वारे त्यांना समजून घ्या त्यांच्याशी मोल भाव करू नका असेही त्यांनी भावना व्यक्त केली तसेच हरियाणा येतील प्रदीप सांगवान यांच्या हिलिंग हिमालया या उपक्रमास मन की बात मध्ये उल्लेख झाल्यापासून मोठ्या प्रमाणात या मोहिमेस पाठबळ मिळाले याबद्दल प्रदीप सांगवान यांनीही मन की बात चे आभार व्यक्त केले तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की टुरिझम याबाबत प्राकृतिक सौंदर्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी स्वच्छता पाळावी तसेच आपल्या देशातील म्हणजेच आपल्या राज्यांच्या व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा हा संदेश त्यांनी दिला तसेच युनेस्को येथील डी जी यांचे मन की बात च्या 100 या कार्यक्रमात शुभ संदेश प्रसारित झाला तसेच पुढील काळातील देशवासीयांनी असेच सहकार्य करावे असे ही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…