कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांचे कार्य प्रेरणादायी त्यांच्या कार्याचा वसा जपण्यात त्यांची पिढी सावंत कुटुंब सक्षम- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी कामगार नेते सुभाष अण्णा सावंत यांचे कार्य हे दिशादर्शक होते त्यांच्या कार्याचा वसा वारसा सावंत कुटुंब सक्षम पुढे नेण्याचे कामत्यांची पिढी करत आहे असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले. 
कामगार नेते, हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या ७२ व्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
“हमाल भवन ” येथे सकाळी नऊ वाजता करमाळा तालुक्याचे आमदार श्री. संजय मामा शिंदे यांच्या हस्ते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी सभापती किसना अण्णा शिंदे, संचालक डॉ. हरिदास केवारे, मा.संचालक बाळासाहेब जगदाळे, नायब तहसीलदार सुभाष बदे ,जेलर समीर पटेल, गोपाळ बापू सावंत, विठ्ठल आप्पा सावंत, मा. उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, मंडळ अधिकारी दादा ठाकर, मंडळ अधिकारी घुगे, सरपंच भोजराज सुरवसे, चेअरमन सुजित तात्या बागल, चेअरमन दत्तात्रय अडसूळ, ॲड राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, पै. सुनील बापू सावंत उपस्थित होते.
यावेळी जयंती चे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर , डॉ. राहुल कोळेकर , नगरसेवक राजू आव्हाड, खलील मुलाणी, देवा लोंढे, संतोष वाघमोडे, गणेश मुरूमकर यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी सोपान बारवकर , गजानन गावडे , बाबुराव खुळे, आयुब शेख , भीमराव लोंढे उपस्थित होते.
तर गुरु गणेश दिव्य रत्न गोपालन या संस्थेतील / गो शाळेतील गाईंना ( जनावरांना ) हिरवा चारा चेअरमन मनोज गोडसे, नगरसेवक मनोज राखुंडे, पत्रकार संजय शिंदे, अध्यक्ष नाना मोरे, संभाजी होनप, ॲड. प्रशांत बागल यांच्या शुभहस्ते वाटण्यात आला असुन यावेळी ॲड. राहुल सावंत, नगरसेवक पप्पू सावंत, मा.नगरसेवक फारूक जमादार, मा.नगरसेवक विजय सुपेकर, संचालक वालचंद रोडगे, मा. संचालक विठ्ठल रासकर, जालिंदर जाधव, निशांत खारगे , सागर परदेशी, मजहर पठाण, बापू नलवडे उपस्थित होते.
तसेच यावेळी विलासराव घुमरे सर, चेअरमन शिवाजी बंडगर सर, जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे , सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, मा सरपंच नामदेव शेगडे, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक ॲड नवनाथ राखुंडे, डॉ. संजय कोग्रेकर, देवानंद बागल, अरुण काका जगताप, शशिकांत केकाण, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार जयंत दळवी, पत्रकार नरेंद्र ठाकूर ,पत्रकार सुनील भोसले, मिलिंद फंड सर, राख सर, मा. संचालक प्रकाश झिंजाडे ,मदन काका देवी, डॉ. खोसे, तुषार शिंदे, सरपंच केशव शेळके, अतुल थोरवे ,मोरे भाऊसाहेब सरपंच ,सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र घाडगे, विश्वास काका बागल, मा सरपंच अजित तात्या पाटील , मानसिंग भैय्या खंडागळे ,व्यापारी विजय दोशी, नवनाथ सोरटे, अनिल सोळंकी, प्रीतम गादिया, मयूर दोशी, मनोज पितळे, गोरख ढेरे ,राजेंद्र काळे, बाळू दळवी, दौलत वाघमोडे, दादा इंदलकर ,आझाद शेख उपस्थित होते.
स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंती चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव गोसावी, महादेव कांबळे, राजू कांबळे ,अनिल रासकर ,संजय गायकवाड ,सतीश खंडागळे , सुभाष शेंडगे , मोहम्मद पठाण, विठ्ठल गायकवाड , नागेश उबाळे, पांडुरंग सावंत, मजहर शेख, राजकुमार सुरवसे, बंडू अडसूळ, दादा सुरवसे ,शरद वाडेकर, आकाश कुरकुटे, सागर सामसे, बापू उबाळे आदी जणांनी परीश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago