करमाळा प्रतिनिधी
दिनांक 28 एप्रिल रोजी अचानक उद्भवलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावातील केळी ,पपई ,आंबा , लिंबोणी आदी फळबागांबरोबरच तरकारी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते.वादळात झाडे अंगावर पडून काही जनावरेही मृत झालेली होती. आज 1 मे रोजी देवळाली व खडकेवाडी येथील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केली. त्यांचे समवेत प्रभारी तहसीलदार श्री विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे , कृषी सहाय्यक ,ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.
दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारनंतर करमाळा तालुक्यातील चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे, उमरड, देवळाली, सरपडोह आदी जवळपास 30-35 गावांमध्ये वादळामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ती नुकसान झाले होते.संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा सर्वे करून त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी
सुजित तात्या बागल , बाळनाथ जगदाळे, माजी सरपंच आशिष गायकवाड, सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे ,प्रकाश कानगुडे, चेअरमन रामभाऊ रायकर ,संजय कानगुडे ,प्रभारी तहसीलदार जाधव साहेब ,तालुका कृषी अधिकारी वाकडे साहेब, सर्कल राउत साहेब, तलाठी शितल सूर्यवंशी मॅडम, ग्रामसेवक श्रीधर नागरसे, कृषी सहाय्यक महेश रांजुण व देवळाली खडकेवाडीतील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…