करमाळा प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2021- 22 आणि 2022- 23 मधील मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती देयकाचा प्रलंबित निधी येत्या आठ दिवसात वितरित करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट एड. अनएडेड रुरल संस्थेचे अध्यक्ष तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिला आहे.याबाबत अध्यक्ष प्रा. झोळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रज्ञान कार्यकारी संचालक जयश्री भोज यांना संघटनेचे निवेदन पाठवून सर्व प्रवर्गाची शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्याची विनंती केली आहे. ही शिष्यवृत्ती लवकर जमा करण्याची संस्था व विद्यार्थ्यांची महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लि. ला विनंती आहे ;अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिष्यवृत्तीची बिले जानेवारी महिन्यात मंजूर झाली आहेत, परंतु अद्याप ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत.
शासनाने बिले दिली, परंतु आपल्या सिस्टीममुळे ही मिळाली नाहीत, ही खेदाची बाब आहे. राज्यातील लाभार्थी ३ लाख 25 हजार 525 असून, सन 2021-22 चा 317 कोटी 91 लाख 46 हजार रुपये, तर 2022 -23 चा 445 कोटी 34 लाख 12 हजार 608 एवढा निधी प्रलंबित आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षातील दोन हप्ते बाकी असून, 76 कोटी 9 लाख 19 हजार 794 रुपये, तर शैक्षणिक वर्ष 2022- 23 चे दोन हप्ते 773 कोटी 64 लाख 96 हजार 248 रुपये निधी प्रलंबित आहे. असा सर्व प्रलंबित निधी शासनाने देऊनही 1794 कोटी 20 लाख रुपये आपल्या सिस्टीममुळे प्रलंबित आहे. तरी हा निधी 3 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा; अन्यथा १५ टक्याप्रमाणे संबंधित विद्यार्थी व संस्था यांना व्याज देण्यात यावे; अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल व या सर्व प्रलंबित प्रकरणाची जबाबदारी आपणावर का फिक्स करू नये, याचे लेखी कारण द्यावे प्रलंबित शिष्यवृत्ती खात्यावर जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…