उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सीना कोळगाव धरण यावर्षी ओहर फ्लो झाले होते .त्यामुळे या धरणाचे पाणी उन्हाळी आवर्तनामध्ये कोळगाव उपसा सिंचन योजनेद्वारे करमाळा तालुक्यासाठी दिनांक 1 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाले असल्याची माहिती करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. सदर उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा फायदा या कोळगाव गौंडरे आदी गावांना होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत येणाऱ्या सीना कोळगाव प्रकल्पाची सन 2022 – 23 ची उन्हाळी हंगाम नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक आज दि.28 फेब्रुवारी रोजी उस्मानाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली होती. या बैठकीमध्ये उन्हाळ्यात करमाळा तालुक्याला 2 आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
सीना कोळगाव प्रकल्पाचा पाणी सोडण्याचा कार्यक्रम काल कोळगाव प्रकल्प पंप गृह येथे झाला याप्रसंगी गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव दौंडे, माजी सरपंच दिनकर सांगडे, भाऊ हनपुडे, ज्योतीराम कापले, ग्रामपंचायत सदस्य कालिदास रणमुडे, उमराव रणमुडे, सदाशिव कोपनर तसेच सीना कोळगाव प्रकल्पाचे शाखा अभियंता कांबळे, चौगुले साहेब आदी उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…