करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जाहीर केली
या कार्यकारणी मध्ये “प्रदेश निमंत्रित सदस्य” म्हणून करमाळा येथील भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांची वर्णी लागलेली आहे..
श्री चव्हाण यांनी सोलापुर विद्यापीठ सिनेट सदस्य, दक्षिण पश्चिम रेल्वे समिती सदस्य, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, अध्यक्ष सर्वोदय प्रतिष्ठान या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवणे तसेच विकास कामांना प्राधान्य देऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून,अनेक विषय मार्गी लावलेले आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, रणजीत सिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी ,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पुढील काळात ही सक्रिय राजकारणांमधून जनते च्या कामांना प्राधान्य देऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…