मुक्या प्राण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन कै. नामदेवराव जगताप यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा जगताप कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम- दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी – भर उन्हात रानोमाळ फिरणाऱ्या मुक्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन एक प्रकारे फार मोठी पुण्याई व एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम आमचे सहकारी व मित्र चिंतामणी दादा कुटुंब आणि  बंधूंनी आज सुरू केला आहे.हा स्तुत्य उपक्रम असून निश्चितपणे कौतुकास्पद गोष्ट असल्याची प्रतिपादन मकाई कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज करमाळा येथे कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर उपस्थित होते. आज करमाळा येथे तालुक्याचे माजी आमदार देशभक्त कै नामदेवरावजी जगताप यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त करमाळा येथील फॉरेस्ट मध्ये मुक्या प्राण्यांसाठी व पशू पक्षांसाठी तीव्र उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन तयार केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचे पूजन मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभिक कै नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते करण्यात येऊन उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे उपसभापती चिंतामणीदादा जगताप यांनी केले. तर स्वागत माजी नगरसेवक राहुलभैया जगताप व काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर, वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, आदिनाथ चे माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, प्राध्यापक शहाजीराव देशमुख सर ,केतुर चे माजी युवा सरपंच उदयसिंह तथा धनी साहेब मोरे पाटील ,कल्याण सरडे सर ,आदिनाथ चे माजी संचालक दिनेश भांडवलकर, प्राचार्य मिलिंद फंड सर, मार्केट कमिटीचे संचालक देवानंद ढेरे ,नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड ,विजयराव पवार ,अक्षय सरडे ,कंदरचे सुभाष पवार ,निमगावचे सतीश निळ ,अनिल मामा शिंदे, मुगाजीराव येवले, अरुण घाडगे ,भाऊसाहेब विजयकुमार निपसे, विजय दादा साळुंखे सोलापूर येथून आवर्जून उपस्थित असलेले अजयकुमार दासरी प्रभाकर शिंदे यांच्यासह शेकडो मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते. यानंतर सर्व मान्यवरांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कैलासवासी नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी आदरणीय साहेबांचे अनेक जुने जाणते अनुभवी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पृथ्वीराज भैय्या जगताप विश्वराज जगताप अथर्व फाटके आर्यनराजे फाटके, रणविजय जगताप या सर्व युवा टीमने यशस्वीपणे केले होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

19 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

20 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago