करमाळा प्रतिनिधी
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांची राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यशाळा सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता, पद्मश्री पोपटराव पवार, (कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना समिती महाराष्ट्र,) यांच्या अध्यक्षतेखाली, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी राज्यविश्वस्त राणीताई पाटील, अश्विनीताई थोरात, राजीव पोतनीस, आनंदराव जाधव, किसन जाधव, शिवाजी आप्पा मोरे, पांडुरंग नागरगोजे, सुधीर पठाडे, नारायण वनवे, सुप्रियाताई जेधे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांमधून आगामी नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती कार्यक्रम, तसेच सरपंच परिषदेमध्ये काम करणाऱ्या व ग्रामविकासाचे शिल्पकार असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्यातील सरपंच परिषदेच्या राज्य विभाग जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी यांच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.बैठकीचे ठिकाण-साई पालखी निवारा नगर मनमाड रस्ता (निमगाव निघोज)शिर्डी ता.राहता जि. अहमदनगर आहे. तरी करमाळा तालुक्यातील सर्व सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन सरपंच परिषदेचे करमाळा तालुका समन्वयक डॉ.अमोल दुरंदे यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…