करमाळा प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय्य बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर व तालुका च्या वतीने करमाळा शहरामध्ये गोरगरीब महिलांना साडी वाटप करून साजरा करण्यात आला.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरातील मौलाली माळ याठिकाणीगोरगरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, करमाळा बिट चे psi मिठू जगदाळे , साडे व केम बिट चे psi प्रवीण साने , ऍड.जुगल खरात यांनी वाढदिवसाचा केक कापला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास कांबळे, देवीदास भोसले, जालिंदर गायकवाड , तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे , नंदकुमार कांबळे , शहर अध्यक्ष विशाल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दिपकजी काकडे , गेंदाप्पा कांबळे , राजू सय्यद , यशवंत कांबळे , जितेश रणबागुल , लक्ष्मण भालेराव , सावताहारी कांबळे , अजय कांबळे , यश कांबळे , आशिष कांबळे ,आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
मदारी समाजाचा विचार करून समाजामध्ये साडी वाटप केल्याबद्दल मदारी समाजाचे तालुका अध्यक्ष उमर मदारी , आक्रम मदारी , मुन्ना मदारी ,बबलू मदारी यांनी वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदू कांबळे यांनी केले तर आभार समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…