Categories: करमाळा

घारगाव ते पाडळी रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्याची झाली दुरावस्था रस्ता दुरुस्त करण्याची सरपंच लक्ष्मी सरवदे यांची मागणी

घारगाव प्रतिनिधी
घारगाव ते पाडळी पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचनार असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येनार नाही त्यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता घारगाव पासून पाडळी रस्ता तीन किलोमीटर पर्यंत खूप खराब झालेला आहे घारगाव पाडळी रस्ता पुढे तरडगाव, जवळा, धोत्री ,खरसवाडी ,अष्टविनायक गड या ठिकाणी जोडला गेलेला आहे प्रत्येक चतुर्थीला अष्टविनायक गडावरती भाविक भक्तांची गर्दी असते या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे सदर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून पावसाळ्या अगोदर खडीकरण करून घ्यावे असे आदेश द्यावेत व खड्डे बुजवावेत अशी मागणी घारगावचे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago