करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक २२ मे रोजी शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य हलगी मोर्चा आयोजित केला असून सदर हलगी मोर्चा मध्ये करमाळा शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे
यावेळी करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारलेअसुन शहर विकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात नियमित व उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, सध्या शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असुन त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असुन रोगराई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही शहरात प्रचंड घाण झालेली आहे जंतु नाशक पावडर ची फवारणी केलेली दिसुन येत नाही तसेच कनिष्ठ अभियंता आठवड्यातुन दोन दिवस काम करत असल्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे शासनाचे अनुदान आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही ,करमाळा शहरातील अतिक्रमण घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार कड़े पाठ पुरावा करण्यात यावा ,शासनाचा दलित वस्ती साठी आलेला निधी दलित वस्तीतच ख़र्च झाला पाहीजे पावसाळ्यापुर्वी ओढे नालेची साफसफाई करण्यात यावी आरोग्य विभागातील ठेकेदारावर जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या कडे केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अश्या अनेक मागण्या साठी शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासुन हलगी मोर्चा निघणार असुन पुढे फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक , सुभाष चौक राशीन पेठ, भारत रत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा , गायकवाड़ चौक पुणे रोड मार्गे नगरपालिका कार्यालय कड़े जाणार आहे तरी या हलगी मोर्चा मध्ये करमाळा शहरातील सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे या निवेदनावर फारुक जमादार मनोज गोडसे ,देवा लोंढे विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे खलिल मुलाणी मनोज राखुंडे हाजी फारुक बेग पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ अशोक मोरे विकास उबाळे विकास घोलप किरण उबाळे दिपक सुपेकर आदी जणांच्या सह्या आहे.