करमाळा प्रतिनिधी अंध लोकांसाठी केलेले कार्य जीवनात ध्येयपूर्ती करणारी अंध लोकांची सेवा जीवन खऱ्या अर्थाने जीवनाला एक वेगळे वळण देणारे असून अंध व्यक्तीची मार्गदर्शकाची भूमिका आपल्या जीवनात एक नवीन दिशा पुरस्कार देणारी ठरली असे मत प्राध्यापक सचिन मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले .मन्वंतर सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक डाॅ. सचिन मोरे यांचा सत्कार नंदन प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने अध्यक्ष जितेश कटारिया युवा नेते प्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रो. डॉ. विजय कदम या पार्शली ब्लाईंड मित्राला वाचून दाखवताना अंधांसाठी काम करण्याची दिशा मिळाली. प्रो. डॉ. विजय कदम आज अहमदनगर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले की परमेश्वराने आपल्याला सर्व अवयवांनी संपन्न केले असतानाही न्यूड गंडाच्या भावनेतून माणूस आपले स्वरूप विसरतो व चुकीच्या मार्गाने जाऊन भरकटून आपले करियर उध्वस्त करतो मला पुरस्कार मिळाला त्याचे सर्व श्रेय मी या अंध लोकांच्या कार्याला देतो कारण ज्या 35 लोकांना मी मार्गदर्शक म्हणून काम केले ते सर्व लोक विविध क्षेत्रांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहून सुखी संपन्न आयुष्य जगत आहे परमेश्वराने त्यांना एक अवयव कमी दिला आहे तरी त्यांनी त्याचे भांडवल न करता आपल्या अतेंद्रिय शक्तीचा उपयोग करून जीवनामध्ये यश मिळवले आहेलहरो से डरकर नका पार नही होती कोशिश करने वाले की कभी हार नही होती अशा पद्धतीने आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनाची ध्येय काय याचा विचार करून जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक आव्हान समजून कार्य केले तर तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो माझा जन्म एका मध्यमवर्गीय व्यवसायिकाच्या पोटी झाला जीवनात असलेला संघर्षालाच मी माझी शक्ती मानुन काम केले. बीए पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे मी एम ए एमफील सेट नेट पीएचडी असा यशस्वी प्रवास करून अहमदनगर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून मी काम करत आहे. वाटचाल करत असताना मला जीवनात भेटलेली माणसे हीच माझी प्रेरणास्थान असून वडिलांनी दिलेला सल्ला माझ्या जीवनात मोलाचा ठरला आहे आपल्या करमाळ्यात तू मिठाईचे व्यवसाय करून जेमतेम गरजा भागून जीवन जगू शकतो त्यामुळे तुला काय करायचे ते ठरव व या करमाळ्याच्या बाहेर पडून स्वतःचे विश्व तयार करून आपले ध्येय पूर्ण कर तर खऱ्या अर्थाने मला तुझा अभिमान वाटेल त्यांच्या या शिकवणीमुळे आई वडील पत्नी सावंत कुटुंब गल्ली मित्रपरिवार यांच्या प्रोत्साहनामुळे यशस्वी होऊन मी सुखी संपन्न आयुष्य जगत असून हे करत असतानाही अभिनय क्षेत्रामध्ये मला काम करण्याची इच्छा असल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ख्वाडा या चित्रपटांमध्ये पाटील यांची भूमिका करून अभिनय क्षेत्रातही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे समाजाची काहीतरी देणे लागतो या भावनेतून करमाळ्यासाठी भविष्यामध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास भाजपाचे माजी शहराध्यक्ष जितेश कटारिया प्रकाश क्षीरसागर भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शाम सिंधी पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर दिनेश मडके,इंजिनीयर निलेश माने गणेश वाशिंबेकर संजय जमदाडे पिंटू भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…