करमाळाा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मलवडी गावात प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री विद्यमान आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून 16 मे रोजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, युवा गाडी जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दादा कोंडलकर तालुका संघटक नामदेव पालवे यांच्या नेतृत्वात व बुधराणी आणि हॉस्पिटलची सर्व डॉक्टरांची टीम यांच्या सहकार्याने नेत्ररोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले जवळ जवळ 100 लोकांची तपासणी या शिबिरात झाली तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी 25 लोकांची निवड ही करण्यात आली ज्या ज्या गरजूंना चष्म्याची गरज आहे त्यांना चष्मे देखील वाटण्यात आले अशाप्रकारे लोकनायक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या पावलावर पाऊल ठेवत महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई यांनी रुग्णसेवेचे व्रत हाती घेऊन लोकांच्यासाठी इथून पुढच्या भविष्यकाळात करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात अशा प्रकारचे शिबिर राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युवा आघाडी गणेश दादा कोंडलकर प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे तालुका संघटक नामदेव पालवे प्रवीण म्हात्रे मलवडी सरपंच सौ बायडाबाई सातव उपसरपंच साहेबराव दुर्गुळे, ग्रामपंचायत सदस्य लताताई कोंडलकर कविता पालवे सुरेखा देडगे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…