Categories: करमाळा

करमाळयाचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. बऱ्याच काळापासून ते काँग्रेसशी संलग्न होते तर काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची एक चांगली ओळख निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष वैभव जगताप व उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.
वैभवराजे जगताप यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील राजकारणाची बरेचशे गणित बदलणार असल्याचे दिसत आहे.  काँग्रेसच्या माध्यमातून मागील निवडणुकीत माढा करमाळा विधानसभा मतदार संघ युवक काँग्रेस अध्यक्षच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांची निवड झाली होती. वैभवराजे जगताप यांनी शिवबंधन बांधल्यामुळे आता उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले दिवस येतील असे जाणकार बोलत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणार वर्ग शहर व तालुक्यात मोठा आहे. त्यांचे पुत्र वैभवराजे जगताप ठाकरे गटात प्रवेश केला तर दुसरे पुत्र शंभूराजे जगताप भाजपचे काम करीत आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता जगताप गट सत्तेेच्या राजकारणात काय भुमिका घेणार हा येणारा काळ ठरवणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago