करमाळा प्रतिनिधी मकाई साखर कारखाना निवडणुकीमध्ये खोटी बनावट कागदपत्रे पुरावा म्हणुन सादर केल्याबाबत प्रा.रामदास झोळ यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार ईमेलद्वारे केली आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सभासद या नात्याने निवडणुकीसाठी अर्ज भरला असुन 19 रोजी छाननी झाल्यानंतर उपरोक्त छाननीमध्ये थकबाकी असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करुन नामनिर्दशन अर्जावर हरकती घेण्यात आल्या हरकतदारांनी घेतलेल्या हरकतीमध्ये संबधीत उमेदवार अथवा त्यांचे सुचक अनोमोदक हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे म्हणवणाऱ्या लेटरपॅडवर व मकाई सहकारी कारखाना या दोन्ही संस्था असुन त्यांचा एकमेकांशी संबध नाही असे असताना सदरचे दाखले हे संबधित हरकतदारांनी खोटे व बनावट तयार करुन ते निवडणुक प्रकियेतील छाननी कामी पुरावा म्हणुन वापरले आहेत ते कागदपत्रे सोबत जोडले असुन उपरोक्त विषयान्वये सदर बाब गंभीर असुन फौजदारी गुन्हयाच्या अखरात्यातील आहे तरी याबाबत लक्ष देऊन 22 मे रोजी असणाऱ्या सुनावणीपुर्वी या प्रकरणाची शहानिशा करुन मला न्याय द्यावा अशी मागणी प्रा.रामदास झोळ यांनी केली आहे. आम्ही आदिनाथ कारखान्यावरून दिलेले दाखले हे आदिनाथ कारखान्याच्या दिलेले आहेत आमचा आणि मकाई कारखान्याचा काहीही संबंध नाही आम्ही दिलेल्या दाखल्यावर फक्त आदिनाथ कारखान्याचे शिक्के आहेत . अरुण बागनवर कार्यकारी संचालक आदिनाथ कारखाना*
आक्षेप घेण्यात आलेल्या दाखले हे आदिनाथ कारखान्याचे ओरिजनल दाखले आहेत. त्याच्यावर मकाई कारखान्याचा शिक्का नाही. आदिनाथ कारखान्याचे आकाराने लहान दाखले आहेत. तर मकाई कारखान्याचे शिक्का असलेले हे मोठ्या आकारातील कागदावरील दाखले आहेत. ते दाखले आमचे नाहीत.
…अॅड. दत्तात्रय सोनवणे, बागल गट समर्थक
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…