Categories: करमाळा

मकाई साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाची सरशी उमेदवाराचे सर्व अर्ज मंजुर विरोधकाचे अर्ज अपात्र झाल्याने विरोधकाना धक्का

 

 

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक उमेदवाराची पात्र व अपात्रची यादी आज(सोमवारी) निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बागल विरोधी गटाचे प्रा. रामदास झोळ व मोहिते पाटील समर्थक सविताराजे राजेभोसले यांचा अपात्र तर. सुभाष शिंदे यांच्यासह काही सहकार्याचे पात्र झाले आहे.
पात्र उमेदवार भिलारवाडी ऊस उत्पादक गट : आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झुंजुर्णे, बाबुरावअंबोधरे, संतोष झांजुर्णे.
वांगी उत्पादक मतदार संघ : सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनीषा दौंड व अमित केकान.
चिखलठाण ऊस उत्पादक गट : सतीश निळ, दिनकर सरडे, निर्मला इंगळे.
मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, सुभाष शिंदे व हरिश्चंद्र झिंजाडे.
पारेवाडी ऊस उत्पादक मतदारसंघ : उत्तम (बाळासाहेब) पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, संतोष पाटील, स्वाती पाटील व गणेश चौधरी.महिला राखीव मतदार संघ : सुनीता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ.इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अनिल अनारसे मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बागल समर्थक उमेदवार अर्ज मंजूर झाल्यामुळे बागल गटाची सरशी झाली आहे व विरोधकांना धक्का बसला आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

14 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago