Categories: करमाळा

करमाळा नगरपरिषदवर शहर विकास आघाडीचा हलगी मोर्चा नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात-सुनील बापु सावंत गट नेते


करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर विकास आघाडीचा आज शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य हलगी मोर्चा काढण्यात आलाअसून सदर हलगी मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन मोर्चास सुरुवात करण्यात आली सदर मोर्चा फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक भवानी पेठ दत्त पेठ सुभाष चौक राशीन पेठ पुणे रोड मार्गे नगरपालिका कार्यालय येथे आला
यामध्ये करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. मोर्चा मधील नागरीकांसमोर बोलताना शहरविकास आघाडीचे गटनेते सुनील बापु सावंत म्हणाले की,करमाळा नगरपरिषदेवर प्रशासक आल्यानंतर करमाळा शहरातील पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन काही ठिकाणी नळाला गटारीचे पाणी येत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तर आरोग्य विभागातील साफसफाई करणारे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालु असुन शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असुन शहरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे नगरपालिकेचे या अत्यावश्यक सेवेकडे लक्ष नाही तसेच शहरातील गोरगरीब नागरिक अनेक वर्षापासुन अतिक्रमण घरात रहात असुन त्यांची घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावी त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा शहरातील विकास कामे ठप्प झाली असुन नगरपालिका चे कनिष्ठ अभियंता आठवड्यातुन दोन दिवस कामावर हजर असतात त्यामुळे शहर विकास कामावर परिणाम होत आहे पावसाळ्यापुर्वी नाले साफसफाई चे कामास सुरवात झाली पाहीजे परंतु काही दुर्घटना घडली तर प्रशासनास जाग येते, शहरातील मुस्लिम दफन भुमी (नासीर जंग ) सुशोभित करण्यासाठी अल्पसंख्यक निधी ख़र्च केला जात नाही दलीत वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीतच ख़र्च करावा अश्या अनेक मुलभुत सुविधा मिळाव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सावंत यांनी सांगीतले
यावेळी गोवर्धन चवरे पाटील ,विवेक येवले,देवा लोंढे आदीची भाषणे झाली
यावेळी करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारले असुन यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे यांनी पाठींबा दिला तसेच मदारी समाजाचे नेते उमर मदारी यांनी पाठींबा दिला यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविन्द्र कांबळे मनोज गोडसे विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे खलिल मुलाणी मनोज राखुंडे हाजी फारुक बेग पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ अशोक मोरे विकास उबाळे विकास घोलप किरण उबाळे दिपक सुपेकर शब्बीर शेख उमर मदारी बुवासाहेब धनवे विकास पवार पांडुरंग पवार दादासाहेब इंदलकर बापू उबाळे संतोष बनकर तौफीक शेख सादीक बेग हाजी फारुक बेग रवी जाधव ज़मीर पठान आसिफ कुरेशी विजय सुपेकर नितिन ओभासे सिंकदर सय्यद राजु वीर आदी जण उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

14 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago