करमाळा प्रतिनिधी- निवडणुकीचा फाॅर्म बाद झाल्याच्या वैफल्यातून बागल गटावर बेछूट आरोप करत सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठीच विरोधकांची केविलवाणी धडपड सूरू असून मकाई च्या निवडणुकीसाठी आमचे नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली सज्ज असल्याने विरोधकांनी स्वतःच्या ताकदीच्या बाहेरची आव्हाने करू नये असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे यांनी केले.
मकाई सह साखर कारखाना निवडणुकीत केवळ थकबाकीदार असल्याने बागल कूटूंबातील कोणी अर्ज भरला नाही असे दावे करताना ते कर्ज का काढले गेले हे मात्र सांगणं कावेबाजपणे टाळतात.
नियम न समजून घेता अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालेल्या विरोधकांना निवडणुक प्रशासनाने एक प्रकारे हि चपराकच मारलेली आहे! यातून तालुक्यातील जनतेमध्ये विरोधकांचे हसू झाले आहे.
ज्यावेळी राष्ट्रीय बँका सहकारी कारखान्यांना कर्ज देण्यास तयार नव्हत्या तेव्हा चेअरमन दिग्विजय बागल व बागल कूटूंबियांनी आपली खाजगी प्राॅपर्टी तारण ठेवून हा कारखाना चालू ठेवला हे उभ्या तालूक्याला माहिती असताना बागल यांनी फाॅर्म न भरल्याची हास्यास्पद कारणे जे विरोधक देत आहेत त्यांनी स्वतःच्या मालमत्ता सहकारी संस्थांसाठी देण्याची तयारी दाखवावी आणि मग आम्हाला विरोध करावा.
खरं पाहता विरोधकांसोबत लढण्यासाठी दिग्विजय बागल यांची आवश्यकताच नाही. त्यांच्यासाठी बागल गटाचे कार्यकर्तेच खंबीर आहेत.इलेक्शन प्रक्रियेत स्वतःचे फाॅर्म ही टिकवू न शकणारे विरोधक स्वतःच्या अज्ञानाला लपविण्यासाठी चुकीची कारणे सांगत आहेत हे न करण्याएवढी करमाळा तालुक्यातील जनता दुधखुळी नाही.
राहिला विषय लढण्याचा तर आम्ही कालही रणांगणात होतो अन आजही आहोत.
तसं पाहायला गेलो तर आम्ही आक्षेप घेतलेल्यांपेक्षा प्रशासनाने शासकीय तपासणीत बाद केलेल्या फाॅर्मस ची संख्या अधिक आहे.आम्ही आक्षेप घेतलेल्या अर्जांसाठी अजूनही आमची लढाई वरिष्ठ न्यायालयात चालूच ठेवणार आहोत.
विरोधकांनी आपले उरले-सुरले उमेदवार अर्ज माघारी घेऊ नयेत या भीतीपोटी सवंग बातम्या अन स्टेटमेंट्स न देता गंभीरपणे इलेक्शन प्रक्रियेला सामोरे यावे.
या निवडणुकीत बागल गट पुर्ण तयारीनीशी उतरलेला असून विरोधकांनी किमान आतातरी मकाई सारख्या तालुक्यातील महत्वाच्या संस्थेचं इलेक्शन गांभीर्याने लढवावं व स्वतःची शोभा करून घेऊ नये असा टोलाही बाळासाहेब पांढरे यांनी लगावला.त्याचबरोबर मकाई च्या सभासदांचा विश्वास आजही बागल कूटूंबियांवर असून कारखाना आजपर्यंत देखील स्व दिगंबरराव बागल मामांच्याच विचाराने चालत आला असून साखरधंदा अडचणीत असल्याने कित्येक कारखाने ऊस पेमेंट पुर्ण करु शकलेले नाहीत.असा मकाई हा एकमेव कारखाना नाही.परंतु उत्पादक शेतकऱ्यांची देणी लवकरात लवकर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. स्वतः दिग्विजय बागल निवडणुकीपेक्षा पेमेंट तरतुदीसाठी प्रयत्नरत आहेत. पूढे देखील स्व मामांच्याच विचाराने मकाई चालवणार असून त्यामुळेच लोकशाही ला आम्ही मानत आहोत.
बागल गटावर हूकूमशाहीचा आरोप करणा-या तथाकथित नेत्यांनी आदिनाथ कारखान्यात काम करणा-या एका सर्वसामान्य कूटूंबातील कर्मचा-याला धमकावणे,त्याला कानाखाली मारणे असली दबंगगिरी करताना आपण लोकशाही विसरले होतात की काय?आपल्याला हवी तशी कागदपत्रे मिळविण्यासाठी कारखानास्थळी दिवसभर ठाण मांडून सर्वसामान्य कर्मचारी व एम.डी यांना दमबाजी केली गेली.हे केवळ वैफल्यग्रस्त भावनेने केले गेले हे सगळे जाणतात *मूळात फाॅर्म भरण्याचे ठळक नियमसूद्धा माहीत नसणारे हे तथाकथित विरोधक कारखाना चालविण्याच्या पात्रतेचे तरी आहेत काय? याचा विचार करण्याची गरज आहे. दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाई कारखाना गतवैभव प्राप्त करणार असल्याचा विश्वास येथील सभासद व जनतेला आहे.असेही बाळासाहेब पांढरे यांनी म्हटलेेेेे आहेे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…