करमाळा प्रतिनिधी
देशाच्या पटलावर सामाजिक कार्याचा ठसा उमटवून दिल्लीपासून कन्याकुमारी पर्यंत टायगर ग्रुपचे विश्व निर्माण करून तसेच परदेशी लोकांना देखील टायगर ग्रुपची भूरळ निर्माण करणारे, टायगर ग्रुपचे राष्ट्रीय पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांनी टायगर ग्रुपच्या नावाची बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने अंतर्गत अद्दल घडवणार असल्याचे जाहीर केले आहे.
टायगर ग्रुप चे दोन कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत. समाजसेवा, गोरगरिबांना अन्नदान, अपघात ग्रस्तांना तातडीची मदत, गोरगरिबांना मोफत कपडे व किराणा साहित्य वाटप, गो शाळांना मोफत चार वाटप, अंधांना काठी तर अपंगांना व्हील चेअर वाटप, अनाथ आश्रमांना , शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, शालेय मुलींना मोफत सायकल वाटप, भव्य
आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांना यथोचित मदत, नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांना सर्वोतोपरी मदत, भव्य रोजगार शिबिरे, गोरगरीब तसेच अनाथ मुले व मुली शालेय शिक्षणासाठी दत्तक अशा अनेक उपक्रमांमध्ये टायगर ग्रुपची देशभरात एक आगळी वेगळी ओळख आहे. तर या ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांनी अशाप्रकारे समाजसेवा करणारे असंख्य युवक घडवले. डॉ. जाधव यांच्या तालमीत तयार झालेल्या युवा समाजसेवकांनी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करून देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून मोठे योगदान दिले जाते. राज्यभर सुमारे 20 पेक्षा अधिक ॲम्बुलन्स या ग्रुपच्यावतीने मोफत सेवा देण्याचं काम करतात. तर करमाळा या टायगर ग्रुपच्या मुख्यालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज सुमारे दहा-बारा गाड्या येऊन डॉ. जाधव यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्नांची सोडवणूक करतात. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बेरोजगारांच्या समस्या यांची सोडवणूक करतात तर अनेक उद्ध्वस्त झालेली विवाहत कुटुंब पुन्हा जोडून नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. टायगर ग्रुप आपल्या ऊर्जेचा वापर चांगल्या कामासाठीच करत असून असंख्य युवकांना समाजसेवा करण्याचे व युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शिकवण दिल्याने, युवा उर्जा सत्कारणी लावल्याने अनेक पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले आहे. तर अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी देखील ग्रुपच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
परंतु काही तोतया भामट्या व्यक्ती या आपण या टायगर ग्रुपचे सदस्य असल्याचे भासवून ग्रुपची बदनामी होईल असे गैरकृत्य करत असल्याचे निदर्शनास झाले आहे, अशा ठकसेनांवर कायदेशीर कारवाई करून अद्दल घडवणार असल्याचे डॉ. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अशा प्रकारे तोतयोगिरी करणाऱ्या ठकसेनांच्या भूलथापांना बळी पडू नका, सदर व्यक्ती सभासद आहे की नाही या माहितीसाठी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव मो. ७३८७२२९९९९ या हेल्पलाईन वर संपर्क करण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकात केले आहे.तर असा सभासद आढळून आल्यास त्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ सभासदत्व रद्द करणार असल्याचे नमूद केले आहे. असे ततयोगिरी करणारे व ठकसेन टायगर ग्रुपच्या रडारवर असून सदस्य नसताना असल्याचे भासणार्यांना कायदेशीर अद्दल घडवणार असल्याचे म्हटले आहे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…