करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीचे म .गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा तालुक्यात सर्वात जास्त ९९.३९% निकाल लागला आहे . तालुक्यात सर्वात जास्त ३३४ विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती . त्यापैकी ३३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते . यामध्ये ३३० विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत . तब्बल १७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणीत , ८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,१९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा .आ . जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , विश्वस्त शंभूराजे जगताप , प्राचार्य पी.ए . कापले , उपप्राचार्य बागवान सर , पर्यवेक्षक एस.टी .शिंदे , बी .के . पाटील , विभाग प्रमूख व्ही .एल . पवार , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे . प्रशालेचे यशवंत विद्यार्थी पूढील प्रमाणे : १ )कु . प्रणाली पोपट मोहोळकर – गुण – ५५१/६०० – ९१ . ८३% २)कु .सिमरन अयूब सय्यद -५४९ /६०० – ९१ .५०% ३)कु . मयूर प्रविण महिंद्रकर – ५४६/६०० – ९१.००%
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…