करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमचे सात अर्ज मंजूर झाले असून उर्वरित अर्ज मंजूर होण्यासाठी आम्ही अपील केलेले आहे ते अर्ज मंजूर होतील याबाबत आम्हाला खात्री असून मकाईची निवडणूक आम्ही लढवणारच असे मत मकाई बचाव समितीचे प्रमुख प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली भिगवण येथे मकाई सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मकाई परिवर्तन पॅनलच्या नावाने ही निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला शिंदे समर्थक आदिनाथ ची माजी अध्यक्ष वामनराव बदे मोहिते पाटील समर्थक’मकाई’ निवडणुकीच्यानिमीत्ताने आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक वामनराव बदे, मोहिते पाटील समर्थक आबासाहेब टापरे, स्वाभिमानीचे रविंद्र गोडगे, महेंद्र गोडसे, प्रा. लालासाहेब जगताप गफुर शेख आनंद झोळ राजेंद्र भोसले उपस्थित होते.
यावेळी मकाईच्या निवडणुकीत अपात्र ठरल्यानंतर अपिल दाखल केलेले विशाल शिंदे, प्रविण बाबर, वाळुंजकर आदी उमेदवार उपस्थित होते.
यावेळी स्नेहभोजन झाल्यानंतर राजकीय रणणितीबाबत चर्चा करण्यात आली. पात्र झालेल्या जागांवर आम्ही निवडणुक लढणार असून अपिलात न्याय मिळेल असा विश्वास प्रा. झोळ यांनी व्यक्त केला आहे. सविताराजे राजेभोसले व आम्ही सर्व एकत्रित या निवडणुकीत सामोर जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांच्यांशी चर्चा करून निर्णय घैऊन पुढील दिशा ठरवणार आहे .अपात्र अर्जाबाबत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे सांगितले. यावेळी अर्ज दाखल केलेले उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी विचारविनिमय पुढील रणनीती ही ठरवण्यात आली आहे होणाऱ्या सुनावणी बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली त्यावरून पुढील रणनीती आखली. पोथरे, भिलारवाडी, वांगी, वरकटणे, राजुरी, वाशिंबे, उमरड, गोयेगाव, सोगाव, जातेगाव, हिंगणी येथील कार्यकर्ते उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…