करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवाराचे अर्ज अटी शर्तीची पूर्तता करून अर्ज दाखल केले असताना आमचे अर्ज अपात्र झालेले असुन ते अर्ज नक्कीच मंजूर होतील असे मत मकाई बचाव समितीचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. बारा बंगले करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे अमोल घुमरे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळ सर म्हणाले की तीन वर्षे सलग ऊस घालण्याचा मुद्दा चुकीचा असून इतर साखर कारखान्याने 79 बी नुसार ऊस घालणे बंधनकारक नसल्याचा नियम असताना घटनेत कारखान्याचे उपविधीमध्ये बदल न केल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहे.काल झालेल्या सुनावणीमध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये संत शिरोमणीमध्ये असे असतानाही सर्व अर्ज मंजूर केले आहेत त्यामुळे आमचेही अर्ज मंजूर होतील प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अर्ज मंजूर होऊन आम्हास नक्की न्याय मिळेल याबाबत आम्हाला अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात आम्ही जाणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…