Categories: करमाळा

शेलगाव क येथील सौ.कविता वीर व सौ जयश्री काटुळे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान.

शेलगाव प्रतिनिधी
शेलगाव क ,ता. करमाळा येथील सौ.कविता सुनील वीर व सौ.जयश्री पांडुरंग काटुळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मानित करण्यात आले. 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023 -24 चे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षीपासून ग्रामपंचायत स्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यास प्रारंभ झालेला आहे. प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, पुष्पहार ,शाल व पाचशे रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महिला व बालविकास ,शिक्षण ,आरोग्य जनजनजागृती या विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गावातील महिलांचे अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यामधून महिला बचत गटांचे जाळे निर्माण करणाऱ्या सौ.कविता वीर व कोविड योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ.जयश्री काटुळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच श्री अशोक काटुळे, उपसरपंच श्री सचिन वीर, श्री आत्माराम वीर, श्री राहुल कुकडे, ग्रामसेवक खाडे ,राजाराम वीर ,आनंद वीर , संदीप पाटील, मुकुंद कुकडे, बाळनाथ वीर,सौ.करुणा बनसोडे ,सौ गंगा काटुळे ,सौ. त्रिशला वीर ,सौ मीना वीर, सौ सारिका वीर, सौ पद्मिनी वीर, सौ.गंधारबाई वीर, सौ. भीमाबाई वीर,सौ. सीमा जाधव,सौ.पायल वीर,सौ. प्रतिभा पाटील,सौ. छाया वीर ,सौ.अलका वीर,सौ. अनिता वीर,सौ. शालन वीर ,सौ.कुसुम वीर ,सौ.मीनाक्षी वीर ,सौ.सविता सपाटे,सौ.मनीषा सपाटे ,सौ.संगीता सपाटे ,सौ.तारामती वाघमारे ,सौ.शैला बनसोडे ,सौ.विमल वीर,सौ. सविता वीर आदी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

14 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago