करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्ते, वीज बिल व जलवाहतूक हे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने सादर केल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की करमाळा मतदार संघातील काही विकासकामे रखडलेली असल्याने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना भेटून प्रत्यक्षात सदर कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे विनंती आपण केली. यामध्ये करमाळा तालुक्यातील निधी मंजूर असलेल्या कामांवरील स्थगिती उठवावी अशी मागणी आहे. रस्ते दुरुस्तीची ही कामे असुन रा. मा क्रं 9 ते प्रजिमा क्रं 4 (कोंढेज-निंभोरे रस्ता) या कामासाठी 3 कोटी 33 लाख रुपये मंजूर आहेत. तसेच मिरगव्हाण-अर्जूननगर-सौंदे-वरकटणे-कोंढेज (प्रजिमा क्र 8) यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर आहेत.तर प्रजिमा क्र 6 मधील 0/00 ते 2/500 व 23/100 ते 27/500 या कामासाठी 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर आहेत. प्रजिमा 124 मधील 10/00 ते 15/100 मध्ये दुरुस्ती साठी सुमारे 2 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजुर आहे. परंतू या कामांवर स्थगिती असल्याने हि कामे बंद आहेत. तरी या कामावरील स्थगिती उठवली जावी अशी मागणी आपण केली आहे. तसेच कोरोना कालावधी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेतीसाठी वीज महत्त्वाची असून महावितरण कडून दर वर्षी आडकाठी करुन वीज बिल वसुल केले जाते. तरी मागील संपूर्ण थकीत वीज बिल माफ केले जावे अशी मागणी आपण केली आहे. तसेच उजनी जलाशय हा पुणे व सोलापूर जिल्ह्यात असल्याने जलवाहतूक सेवा सुरू करुन हे दोन जिल्हे जलमार्गाने जोडले जावेत ही आपली पुर्वीची मागणी असून याकामाबाबत प्रत्यक्षात सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी आपण केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…