करमाळा – प्रतिनिधी
मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात करावा. यासंदर्भात माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सिंचन भवन मध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून कुकडी प्रकल्पाच्या फेर जलनियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करून तोही तलाव भरून घेण्याचे नियोजन करावे. अशा सूचना खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना दिले आहे. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात करावा. या मागणीचे निवेदन खा. रणजितसिंह निंबाळकर यांना मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवार दि. १ जून रोजी दिले होते. त्यानंतर लगेच शुक्रवार दि. २ जून रोजी पुणे येथील सिंचन भवनमध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात करून तोही भरून घेण्याचे नियोजन करावे. हा विषय खा. निंबाळकर यांनी विषयसुची मधील विषय क्रं. २४ मध्ये घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मांगी तलावाचा कुकडीच्या फेरजल नियोजनामध्ये समावेश करण्याच्या सूचना खा. निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
या बैठकीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, करमाळा भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, काका सरडे तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधिक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…