.करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सोपानराव टोपे यांनी एकवीस अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते.या निर्णयाविरुद्ध प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्याकडे एकवीस उमेदवारी अर्जावर अपील दाखल केले होते.सोपानराव टोपे यांनी अवैध ठरवलेले अर्ज प्रादेशिक सहसंचालक राजकुमार दराडे यांनी अवैध ठरवले असून यामुळे बागल गटाला दिलासा मिळाला आहे निवडणुकीत बागल गटाच्याविरुद्ध मकाई बचाव समितीच्या माध्यमातून प्रा. झोळ हे मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्या सविताराजे राजेभोसले उतरले आहे.प्राध्यापक रामदास झोळ यांचे सात अर्ज पात्र ठरलेले असून उर्वरित उमेदवारी अर्ज अपात्र झाले आहे.बागल गटामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून फटाके ची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.याबाबत मकाई बचाव समितीचे रामदास झोळ सर यांनी आपण मंजूर झालेल्या पात्र उमेदवारांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार असून अपात्र ठरलेल्या उमेदवाराबाबत उच्च न्यायालयात जाणार असून तेथे आपले अर्ज मंजूर झाल्यानंतर निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…