Categories: करमाळा

पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर महान राज्यकर्त्या होत्या*- *प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त के.हाईट्स बायपास रोड करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, रक्तदान, शरबत व थंड जीआर पाण्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम दिवशी 31मे रोजी *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ॲड.सविताताई शिंदे व प्रा.डाॅ.अंजली श्रीवास्तव साहित्यिका यांच्या हस्ते करण्यात आले.तर रक्तदान व सरबत वाटप उद्घाटन दत्ताकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर यांच्या हस्ते करण्यात आले.* त्याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी रक्तदान शिबिर व सरबत वाटप प्रसंगी आवर्जून भेट दिली.
यावेळी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती सौ.भाग्यश्रीताई शिंदे-खटके व पांडे ग्रामपंचायत सरपंच अनिता मोटे,प्रा.भारत माने, संदीप खटके, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जीवन होगले, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले,माजी.सरपंच संदीप मारकड,शुभम बंडगर, धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, गंगाधर वाघमोडे,तात्यासाहेब काळे, जीआरडी माझाचे संपादक पत्रकार जयंत दळवी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकूर, शामजी सिंधी, ब्राह्मण संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, लेखक डॉ.समाधान कोळेकर, युवा नेते विशाल कोळेकर, संभाजी ब्रिगेडचे राज झिंजाडे,रासप सोशल मीडिया तालुकाध्यक्ष दशरथ मारकड, प्राध्या. श्रीकांत दरगुडे, महानगर सर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, पोपट कदम, रवी विठ्ठल शिंदे, मच्छिंद्र कडू, रासप नेते शंकर सुळ,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार,विकास मेरगळ,रघुवीर खटके, आप्पा भोसले,जगन्नाथ सलगर, नितीन लगस, काशिनाथ होगले,दीपक कडू, राज ठोंबरे, विठ्ठल भिसे, इत्यादी सह उपस्थित होते. प्रतिमा पूजना वेळी अँड.सविता शिंदे यांनी अहिल्याराणी होळकर यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्राध्यापक रामदास झोळ सर म्हटले की,करमाळा येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष सकल धनगर समाजाच्या वतीने तीन दिवसीय सामाजिक कार्य घेऊन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन महापुरुषांची जयंती साजरी करणे हेच खरे अभिवादन आहे. खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी लोकाउपयुक्त कार्य केले.प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले.स्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, बारव, विहिरी, तलाव,मुक्या प्राण्यांना पानवटे, नदीघाट,लोकहिताची अनेक कामे,जातीभेद, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्याबाईनी निर्माण केलेल्या सोयीसह देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचे मोलाची कामे त्यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लढाऊ, महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या.महिलांच्या सक्षमीकरणाची कामे त्यांनी त्याकाळात केली. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिलं.लुटारूनचा बंदोबस्त केला. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारलं. अहिल्याबाई होळकर महान राज्यकर्त्या होत्या.ते रक्तदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना झोळ सर म्हणाले की,
रक्तदान श्रेष्ठ दान आहे, रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते.विशेष म्हणजे जमा रक्तसाठा संरक्षण मंत्रालयाकडे व जखमी सैनिकांसाठी व काही प्रमाणात आजारी गरजू आपघाती रुग्णांसाठी वापरला जातो. यामुळेच गरजू नागरिकांना या रक्तसाठ्याची मदत होते.आसे प्रा.रामदास झोळ यांनी म्हटले आहे.
यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यास राजमाता अहिल्याराणी होळकर यांची प्रतिमा देण्यात आली.तर ४३ किलो साखरेचा सरबत व थंड जीआरचे पाणी चोंडी येथील जाणाऱ्या अहिल्या भक्तांसाठी दिवसभर वाठण्यात आले. याचा लाभ जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अहिल्या भक्तांनी लाभ घेतला.राजमाता पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, शरबत व थंड जीआर पाण्याचे वाटप चा कार्यक्रम के हाईट्स करमाळा येथे उत्साहात पार पडला*

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago