करमाळा प्रतिनिधी रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत .
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…