Categories: करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड

करमाळा प्रतिनिधी
करमाळा-येथील विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर,संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील,सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना + 2स्तरच्या वतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
‘जगात सर्वात दाट सावली असते वडाची ‘.वडाच्या पारंब्यामधून अखंड पाणी टपकत असते त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते म्हणूनच वडाची सावली अदभूत गुणकारी असते. तसेच विहिरीचे पाणी,वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते आणि वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वड हा वृक्ष आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणूनच आपणही या दिवशी वडाची पूजा करतो.खरे म्हणजे या दिवशी सत्यवान लाकडे तोडताना चक्कर येऊन पडला तेव्हा सावित्रीने त्याला याच वडाच्या झाडाखाली आणले त्यावेळी त्या सावलीत त्या पारंब्यांच्या तुषारात,थंडाव्यात आणि सर्वाधिक ऑक्सिजन युक्त ठिकाणी त्याला आणून पतीचे प्राण वाचवले म्हणूनच त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे,निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजेच आहे वटपौर्णिमा.
तसेच पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धन आज काळाची गरज बनली आहे आणि कोरोनाच्या काळात तर सर्वांनाच ऑक्सिजनची किंमत कळाली आहे आणि म्हणूनच आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा वृक्षाची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा.सौ.सुजाता भोरे, प्रा.सौ.मुक्ता काटवटे प्रा.सौ.निता माने , सौ.खटके
श्रीमती मेघा कदम,सौ.अलका शत्रुघ्न जाधव,सौ.जया हनुमंत नलवडे,सौ.प्रियंका अमरजीत नलवडे, श्री.नितीन कांबळे, प्रा. अमोल कांबळे, एन.एस.एस.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago