Categories: करमाळा

मानव अधिकाराच्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी मानवधिकार संघटनेचे कार्य मौलाचे- संतोषकाका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी मानव जीवनामध्ये जनसेवा हिच खरी इश्वरसेवा असुन मानव अधिकार न्याय हक्काच्या संरक्षणासाठी मानवधिकार संघटनेचे कार्य मौलाचे असुन सोलापूर जिल्हाध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड होणे हाच करमाळा तालुक्याचा बहुमान असल्याचे मत अखिल ब्राम्हण मध्यवर्ती शाखा करमाळा अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले
पत्रकार दिनेश मडके यांची मानव अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केले. दिनेश मडके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना संतोष कुलकर्णी म्हणाले की सध्याचे युगामध्ये माणूस माणसापासून दूर चालला आहे स्वतःचै हक्क अधिकार कर्तव्य याची जाणीव नसल्यामुळे आपले स्वातंत्र्य हरवून बसला आहे अशा परिस्थितीमध्ये निकोप समाज निर्मितीसाठी मानवी हक्क संरक्षण काळाची गरज असून सक्षम नागरिकांसाठी उज्वल भवितव्यासाठी मानव अधिकार संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन संतोष काका कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास नरेंद्रसिह ठाकुर सुहास काळे पाटील शाम सिंधी सिध्देश्वर डास,शुभम कुलकर्णी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

2 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

6 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

8 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago