Categories: करमाळा

मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबवणार – भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी – मांगी तलाव कुकडी
लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहोत अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,
पुढे बोलताना ते म्हणाले की
मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात करावा. यासंदर्भात माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सिंचन भवन मध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून कुकडी प्रकल्पाच्या फेर जलनियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करून तोही तलाव भरून घेण्याचे नियोजन करावे. अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना दिले आहे.
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात करावा. या मागणीचे निवेदन खा. रणजितसिंह निंबाळकर यांना मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवार दि. १ जून रोजी दिले होते.त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तुमचा पुण्याचा हेलपाटा वाया जाऊ देणार नाही असे सांगितले व त्यानंतर लगेच शुक्रवार दि. २ जून रोजी पुणे येथील सिंचन भवनमध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात करून तोही भरून घेण्याचे नियोजन करावे. हा विषय खा. निंबाळकर यांनी विषयसुची मधील विषय क्रं. २४ मध्ये घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मांगी तलावाचा कुकडीच्या फेरजल नियोजनामध्ये समावेश करण्याच्या सूचना खा. निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
या बैठकीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, करमाळा भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, काका सरडे तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधिक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते,
या पत्रकार परिषद प्रसंगी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव , वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ झिंझाडे, आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव शिंदे, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे, नितीन झिंझाडे, रायगावचे विलास बरडे, दासाबापु बरडे, मांगीचे किरण बागल, जयंत काळे- पाटील आदिजन उपस्थित होते ,.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago