Categories: करमाळा

हिरडगाव येथील ऊस बिल थकीत मुळे सुरू केलेले उपोषण श्रीगोंदा तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

 

करमाळा प्रतिनिधी :- विक्रम ( विकी ) बबनराव पाचपुतें यांच्या खाजगी मालकीचा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचे सन २०२२-२३ चे २७०० रुपये प्रति टना प्रमाणे बाजार भाव देऊ असे सांगून करमाळा आणि परांडा तालुका येथील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत सुमारे ६ महिने उलटून दमडीही न दिल्याने शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कुलथे यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे अशी माहिती ॲड राहुल सावंत ( अध्यक्ष हमाल पंचायत व माजी सदस्य पंचायत समिती ) यांनी दिली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी विक्रम ( विकी ) बबनराव पाचपुते यांच्या खाजगी मालकीचा साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड हिरडगाव या कारखान्याने श्रीगोंदा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा आणि परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये बाजार भाव देऊ असे सांगून उस गाळपासाठी आणला. ऊस गाळपानंतर १४ दिवसात २७०० रुपये प्रमाणे प्रति टन रक्कम देणे बंधनकारक असताना ही सुमारे ६ महिने उलटून गेले तरी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, पाठपुरावा करून हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये कारखाना प्रशासनाने दिले नाहीत. या उलट कारखान्याने प्रत्येक शेतकर्‍यांच्या उसाच्या वजनाचे ५ टक्के वजनात व वाहतूक कपात केली आहे. सध्या मुलांचे शिक्षणासाठी वह्या, पुस्तके, फी, कपडे तसेच शेतीसाठी खते, औषध, बी बियाणे ,मशागतीसाठी आमच्याकडे पैसे तर नाहीतच उलट बँक पतसंस्था यांचे कर्ज आणि हात उसनवारी घेतलेले पैसे. यांचेच व्याजदर वाढत चालले आहे. तर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा आमचे करमाळा व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे बिलाची रक्कम व्याजासह त्वरित देण्यात यावे यासाठी अँड. राहुल सावंत (मा. सदस्य पंचायत समिती करमाळा), बाळासाहेब गायकवाड (तालुकाध्यक्ष रयत क्रांती शेतकरी संघटना करमाळा), राहुल चव्हाण (मा. सरपंच परांडा), विलास बरडे, सुखदेव चव्हाण, नंदकुमार पाटील, सुनील चव्हाण, अंगत चव्हाण, नाना चव्हाण, हनुमंत पाटील, देविदास पाटील, वसंत चव्हाण, धनंजय कुलकर्णी , सुभाष गणेशकर ,दत्तात्रय सरोदे, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, युवराज दळवी, सुग्रीव चव्हाण, सोमा धनवे, अनिल पुंडे ,वालचंद रोडगे, नवनाथ कोळेकर, बापू जाधव ,रामदास मोडके, सुरज मोडके, युवराज पडळकर , रणजीत बेरगळ, संकेत मल्लाव ,महादेव मस्के ,वैभव मस्के, आकाश कुरकुटे ,गजानन गावडे, सागर सामसे, बापू उबाळे व शेतकरी करमाळा व परांडा यांनी दि. ५/६/२०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले होते . त्या दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कुलथे यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम 20 जून 2023 पर्यंत देऊ असे लेखी पत्र दि. 5/ 6/ 2023 रोजी दिले. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की, आम्ही यापूर्वी पहिली आर आर सी कारवाई ची नोटीस बजावली आहे तसेच दुसरी आर आर सी कारवाई ची नोटीस लगेच काढली असून तुमचे ऊस बीलाची रक्कम 20 जून पर्यंत अदा करण्यात येईल त्यामुळे उपोषण कर्त्यांनी 20 जून 2023 पर्यंत सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील विक्रम बबनराव पाचपुतें यांच्या खाजगी मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याला केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समुह नागपूर यांना भागीदारीत कारखाना चालविण्यास दिला आहे अशी चर्चा होती त्यामुळे तुमच्या उसाच्या पेमेंटची काहीच अडचण नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विश्वास ठेवून त्या कारखान्यास ऊस दिला.
याबाबत सर्व वरिष्ठ संबंधित कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार आणि तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाचा एक रुपयाही अद्यापपर्यंत मिळाला नाही. तरी आमचे ऊस बिलाची रक्कम 20 जून 2023 पर्यंत मिळावी अन्यथा सामुहिक आत्मदहन करणार असा इशारा अँड राहुल सावंत मा. पंचायत समिती सदस्य करमाळा यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago